नाशिक : लम्पीग्रस्त पशुपालकांना 19 लाखांची मदत | पुढारी

नाशिक : लम्पीग्रस्त पशुपालकांना 19 लाखांची मदत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

लम्पीच्या साथीने जिल्ह्यातील 83 जनावरे दगावली आहेत. जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विष्णू गर्जे यांनी शासकीय मदतीबाबत सतर्क राहून आतापर्यंत 75 प्रस्ताव यशस्वीपणे पूर्ण केल्याने जिल्ह्यातील 75 पशुपालकांना 19 लाख 39 हजार रुपयांची मदत थेट बँकेत जमा झाली आहे. जिल्ह्यात 38 गायी, 23 बैल, 14 वासरे यांच्यासाठी पशुपालकांना शासकीय मदत मिळाली आहे. गायींसाठी 11 लाख 40 हजार, बैलांसाठी 5 लाख 75 हजार, तर वासरांसाठी 2 लाख 24 हजार अशी एकूण 19 लाख 39 हजार इतकी मदत मिळाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एक हजार 692 जनावरांना बाधा झाली आहे. त्यापैकी 1 हजार 309 जनावरे पूर्णपणे बरी झाली. जिल्ह्यात 300 जनावरे आजारी असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यापैकी 21 जनावरे गंभीर श्रेणीत, 78 जनावरे मध्यम गंभीर श्रेणीत आहेत. जिल्ह्यात 99.99 टक्के लसीकरण झाले आहे.

हेही वाचा:

Back to top button