लम्पी त्वचा रोग : जिल्ह्यात आतापर्यंत 79 जनावरे दगावली | पुढारी

लम्पी त्वचा रोग : जिल्ह्यात आतापर्यंत 79 जनावरे दगावली

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यात लम्पी या त्वचारोगाने 79 जनावरे दगावली आहेत. त्यापैकी 62 जनावरांच्या मालकांना शासकीय मदत मिळाली आहे. त्यामध्ये 29 गायी, 21 बैल, 12 वासरे यांचा समावेश आहे. म्हणजेच गायींसाठी 8 लाख 70 हजार, बैलांसाठी 5 लाख 25 हजार, तर वासरांसाठी 1 लाख 92 हजार अशी एकूण 15 लाख 87 हजार मदत पोहोचली असल्याची माहिती डॉ. विष्णू गर्जे यांनी दिली आहे. महाराष्ट्रातील विविध जिल्हयांत लम्पी आजाराने जनावरांचा मृत्यू होत असताना नाशिक जिल्ह्यातही आजपर्यंत 79 लम्पी बाधित जनावरांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. आतापर्यंत 1 हजार 609 जनावरांना बाधा झाली आहे. आजपर्यंत 1 हजार 232 जनावरे पूर्णपणे बरी झाली आहेत. जिल्ह्यात 298 जनावरे आजारी आहेत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अजूनही 25 जनावरे गंभीर श्रेणीत, 70 जनावरे मध्यम गंभीर तर 203 जनावरे सौम्य श्रेणीत आहेत, अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विष्णू गर्जे यांनी दिली.

लसीकरणावर भर…
पशुसंवर्धन विभाग तसेच जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाने लसीकरणावर भर दिला आहे. त्याबाबत आतापर्यंत जिल्ह्यात 99.99 टक्के लसीकरण झाले आहे. जिल्ह्यात एकूण 8 लाख 95 हजार 50 इतकी पशुगणना आहे, त्यापैकी 8 लाख 94 हजार 960 इतके लसीकरण झाले आहे.

हेही वाचा:

Back to top button