निवडणूक शाखा : जिल्ह्यात साडेसहा हजार नवमतदारांची नोंद | पुढारी

निवडणूक शाखा : जिल्ह्यात साडेसहा हजार नवमतदारांची नोंद

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
गेल्या दोन आठवड्यांपासून राबविण्यात येत असलेल्या मतदारयादी पुनरीक्षण कार्यक्रमांंतर्गत तब्बल 6 हजार 467 नवमतदारांची नोंदणी करण्यात आली. जिल्ह्यात नाशिक पश्चिम मतदारसंघातून सर्वाधिक 825 अर्ज निवडणूक शाखेकडे प्राप्त झाले आहेत. दरम्यान, नाशिक पदवीधर नोंदणीकडे मतदारांनी पाठ फिरवली असताना नियमित नोंदणीला पहिल्या टप्प्यात चांगला प्रतिसाद लाभला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने वर्षभरातून चार वेळेस मतदारयादीच्या पुनरीक्षण कार्यक्रमांंतर्गत मतदार नोंदणीचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार जिल्ह्यात 1 जानेवारी 2023 या अर्हता दिनांकावर आधारित मतदारयादीचा कार्यक्रम राबविला जातोय. त्यामध्ये नवमतदार नोंदणीसह दुबार व मृतांची नावे यादीतून वगळणे तसेच नाव व पत्त्यात दुरुस्ती करण्यात येत आहे. निवडणूक शाखेने जिल्ह्यातील 15ही विधानसभा मतदारसंघांतील मतदारांच्या प्रारूप याद्या 9 नोव्हेंबरला प्रसिद्ध केल्या आहेत. जिल्ह्यातून आतापर्यंत 6 हजार 467 नवमतदारांनी नोंदणी केली आहे. कळवणमधून अवघे 220 अर्ज प्राप्त झाले आहेत. त्याउलट नाशिक शहरातील तिन्ही मतदारसंघांमधून दाखल अर्जांची संख्या अधिक आहे. दरम्यान, 5 जानेवारी 2023 ला अंतिम मतदारयादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

नवमतदार प्राप्त अर्ज असे…
नांदगाव 426, मालेगाव मध्य 392, मालेगाव बाह्य 489, बागलाण 684, कळवण 220, चांदवड 379, येवला 267, सिन्नर 590, निफाड 302, दिंडोरी 244, नाशिक पूर्व 562, नाशिक मध्य 301, नाशिक पश्चिम 825, देवळाली 322, इगतपुरी 464, एकूण 6467.

हेही वाचा:

Back to top button