समान पाणीपुरवठ्याचे ४५ टक्के काम पूर्ण | पुढारी

समान पाणीपुरवठ्याचे ४५ टक्के काम पूर्ण

विविध अडचणींवर मात करत सुरू झालेल्या समान पाणीपुरवठा योजनेच्या कामाला अपेक्षित गती मिळत नसल्याने साडेचार वर्षांत सरासरी 45 टक्के काम पूर्ण झाले आहे. राजकीय मंडळींच्या विरोधासोबतच पाणी मीटरला आता बाजारातील इलेक्टीक चीपच्या तुटवड्याचा सामना करावा लागत आहे. नागरिकांना समान व उच्चदाबाने पाणीपुरवठा करण्यासाठी आणि सध्या होणारी40 टक्के पाणीगळती थांबवण्यासाठी महापालिकेने समान पाणीपुरवठा योजना हाती घेतली आहे.

ही योजना पुढील 30 वर्षांचा विचार करून आणि शहराची संभाव्य 49 लाख 21 हजार 663 लोकसंख्या विचारात घेऊन आखण्यात आली आहे. या योजनेसाठी अंदाजे 2 हजार 818 कोटी 46 लाख रुपये खर्च गृहित धरण्यात आला असून त्याला पालिकेच्या मुख्य सभेने मे 2015 मध्ये मंजुरी दिली आहे. या योजनेसाठी सल्लागाराची नेमणूक करण्यात आली आहे. योजनेंतर्गत शहरात विविध ठिकाणी 82 पाणी साठवण टाक्या, 1550 किमी लांबीच्या लाहन मोठ्या व्यासाच्या जलवाहिन्या, 120 किमी लांबीच्या पाणी साठवण टाक्यांना पाणीपुरवठा करणार्‍या जलवाहिन्या आणि 3 लाख 18 हजार 847 पाणी मीटर बसवणे, आदी कामे केली जाणार आहेत.

पाइपलाइन टाकणे

वितरण जलवाहिन्या एकूण काम – 1550 कि.मी.
काम पूर्ण – 696.76 कि.मी.
टाक्यांना पाणीपुरवठा करणार्‍या वाहिन्या
एकूण काम – 120 कि.मी.
काम पूर्ण – 63 कि.मी.

पाणी साठवण टाक्या
एकूण टाक्या – 82
काम पूर्ण – 43
काम सुरू – 29
अद्याप कामे सुरूच नाहीत – 10
पाणी मीटर बसवणे

एकूण मीटर – 3 लाख 18 हजार 847
काम पूर्ण – 99 हजार 507

Back to top button