…तरीही कसाब फासावर गेलाच असता : विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार | पुढारी

...तरीही कसाब फासावर गेलाच असता : विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार

 पुणे : पुढारी वृत्तसेवा : देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिष्मा आता संपला असून, भाजपच्या पायाखालची वाळू सरकरल्याने शेवटचा पर्याय म्हणून त्यांनी भारत- पाकिस्तान मुद्द्यांचा आधार घेतला आहे. भाजपच्या पराभवाची सुरुवात महाराष्ट्रातून होईल. इंडिया आघाडीला राज्यात 48 पैकी 38 जागा मिळतील, असा दावा राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेत केला.
काँग्रेस व इंडिया आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारानिमित्त वडेट्टीवार रविवारी (दि. 5) शहरात आले होते. गांधी भवनात त्यांनी पत्रकार परिषदेत संवाद साधत राज्यातील निवडणुकीच्या परिस्थितीवर भाष्य केले.

…तरीही कसाब फासावर गेलाच असता

पाकिस्तानी अतिरेकी अजमल कसाबबाबत वडेट्टीवार यांनी केलेल्या वक्तव्यावर पत्रकारांनी प्रश्न विचारला, त्यावर ते म्हणाले, शहीद पोलिस अधिकारी हेमंत करकरे यांच्याबाबत माजी पोलिस महानिरीक्षक एस. एन. मुश्रीफ यांनी लिहिलेले ‘हू किल्ड करकरे’ या पुस्तकाचा आधार घेऊन मी ते विधान केले. करकरेंवर कसाबच्या बंदुकीतून गोळी झाडली गेली नाही, हे त्या पुस्तकात लिहिले आहे. राहिला विषय कसाबच्या फाशीचा, उज्ज्वल निकम वकील म्हणून या खटल्यात नसते, तरीही कसाब हा फासावर गेलाच असता.

राज ठाकरे वाघ आहेत, पण…

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर बोलताना वडेट्टीवार म्हणाले, खरे तर राज ठाकरे वाघ आहेत, पण त्यांचा आता कोल्हा झाला आहे. त्यांची काहीतरी मजबुरी असल्याने ते भाजपचा प्रचार करत असावेत. यावेळी गोपाळ तिवारी, आशिष दुवा, गुजरातच्या प्रभारी प्रगती आहेर यांची प्रमुख उपस्थिती होती.

हेही वाचा

Back to top button