Horoscope Today | आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? | सोमवार, ६ मे २०२४ | पुढारी

Horoscope Today | आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? | सोमवार, ६ मे २०२४

चिराग दारूवाला

:

चिराग दारूवाला हे प्रसिद्ध ज्‍योतिषी आहेत. सुप्रसिद्ध ज्‍योतिषी बेजान दारूवाला यांचे ते सुपुत्र आहेत. करीअर, आरोग्य, प्रेम, विवाह, अर्थ, व्यवसाय या संदर्भात ते मार्गदर्शन करतात. www. bejandaruwalla.com या वेबसाईटवर तसेच info@bejandaruwalla.com या मेलवर त्यांच्याशी संपर्क साधता येईल.

मेष : लोक तुमच्या कामाचे कौतुक करतील.

वेळ आव्हानात्मक असली तरी कठोर परिश्रमाद्वारे प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यास सक्षम असाल. लोक तुमच्या कामाचे कौतुक करतील. भविष्यातील योजनांबाबत कुटुंबाशी चर्चा होईल. आर्थिक बाबतीत काही मतभेद होऊ शकतात, असे श्रीगणेश सांगतात. व्यवसायातील कामे थंडावतील. कौटुंबिक वातावरण आनंदी राहू शकते. प्रकृतीमध्‍ये किरकोळ चढ-उतार जाणवेल.

वृषभ : कुटुंबातील सदस्‍यांचे सहकार्य मिळेल.

श्रीगणेश म्‍हणतात, आज तुमच्या विशेष कौशल्याचे कौतुक होईल. फोन किंवा इंटरनेटच्‍या माध्‍यमातून नातेवाईकांसह मित्रांशी संवाद साधाल. विद्यार्थी आपले ध्येय साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम घेतील. आर्थिक समस्‍यांचा सामना करावा लागेल. खर्चावर नियंत्रण ठेवा. कुटुंबातील सदस्‍यांचे सहकार्य मिळेल. तब्येतच्‍या किरकोळ तक्रारी जाणवतील.

मिथुन : उधार दिलेले पैसे परत मिळण्यासाठी योग्य वेळ आहे.

आजचा दिवस तुमच्‍यासाठी खूप व्यस्त असेल. आज भावनिक पातळीवर कोणताही निर्णय घेवून का. व्यावहारिक होऊन तुमची कामे पूर्ण करा. उधार दिलेले पैसे परत मिळण्यासाठी योग्य वेळ आहे. जुन्या नकारात्मक गोष्टींकडे दुर्लक्ष करा. व्‍यवसायातील सुधारणांबाबत गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे, असा सल्‍ला श्रीगणेश देतात. जोडीदारासह कुटुंबातील सदस्‍यांकडून भावनिक आधार मिळेल. आरोग्य चांगले राहिल.

कर्क : चांगली बातमी मिळाल्याने घरात आनंदाचे वातावरण राहील.

सध्याच्या दिनचर्येशी जुळवून घेण्यास तुम्‍हाला यश मिळेल. चांगली बातमी मिळाल्याने घरात आनंदाचे वातावरण राहील. नवीन माहिती मिळवण्यात वेळ जाईल. कुटुंबातील वातारवण प्रसन्न राहील. नकारात्मक विचारांमुळे नैराश्यासारखी परिस्थिती उद्भवू शकते घरातील कोणतीही समस्या शांततेने सोडवण्याचा प्रयत्न करा, अशी सूचना श्रीगणेश करतात.

सिंह : आज मेहनतीने परिस्थिती अनुकूल बदल कराल.

श्रीगणेश सांगतात की, आज मेहनतीने परिस्थिती अनुकूल बदल कराल. मेहनतीचे योग्य फळही मिळू शकते. गुंतवणुकीशी संबंधित कामांमध्ये घाई करू नका. धार्मिक कार्यात सहभागी व्‍हाल. जवळच्या नातेवाईकांसोबत वारसाहक्काने मिळालेल्या मालमत्तेशी संबंधित कोणताही वाद वाढू शकतो. परिस्‍थिती संयमाने हाताळा. कोणताही निर्णय घेताना मन स्थिर ठेवा. आरोग्य उत्तम राहिल.

कन्या: कोणताही महत्त्वाचा निर्णय भावनिक होऊन घेऊ नका

महिलांसाठी आजचा दिवस विशेषतः अनुकूल आहे. प्रतिभेच्या जोरावर विशेष ध्येय साध्य करू शकतील, असे श्रीगणेश म्‍हणतात. मालमत्तेशी संबंधित कोणत्याही गंभीर विषयावर चर्चा होऊ शकते. परिणाम सकारात्मक होईल. कोणताही महत्त्वाचा निर्णय भावनिक होऊन घेऊ नका, अशी सूचना श्रीगणेश करतात. वैवाहिक संबंध मधुर होतील.

तूळ : घरातील वातावरण प्रसन्न राहू शकते.

श्रीगणेश सांगतात की, तुमच्या नियोजनबद्ध आणि शिस्तबद्ध दृष्टिकोनातून अनेक गोष्टी योग्‍यरित्‍या पार पाडाल. राजकीय संबंध दृढ होतील. मुलांच्या करिअरशी संबंधित कोणत्याही समस्येवर उपाय शोधल्यास दिलासा मिळेल. चिडचिडेपणा टाळा. घरातील वातावरण प्रसन्न राहू शकते.

वृश्चिक : जुनी मैत्री प्रेमाच्या नात्यात बदलू शकते.

आज आध्यात्मिक कार्यात सहभागी व्‍हाल. मानसिक शांतीही मिळेल. घरातील वातावरण आनंददायी राखण्यात तुमची विशेष भूमिका असेल, असे श्रीगणेश सांगतात. कोणत्याही विशेष विषयावर चर्चा होईल. मुलांवर जास्त नियंत्रण ठेवू नका. त्यांच्याशी मैत्रीपूर्ण वागण्याने त्यांचे मनोबल वाढेल. जुनी मैत्री प्रेमाच्या नात्यात बदलू शकते.

धनु : बाहेरच्या व्यक्तीला तुमच्या कुटुंबात ढवळाढवळ करू देऊ नका.

श्रीगणेश सांगतात की, कुटुंबातील सदस्याच्या लग्नाबाबत आज चर्चा होऊ शकते. बाहेरच्या व्यक्तीला तुमच्या कुटुंबात ढवळाढवळ करू देऊ नका. काहीवेळा तुमचा अतिआत्मविश्वास तुमच्यासाठी त्रासदायक ठरू शकतो. वैयक्तिक कामांमध्ये व्यस्त राहिल्यामुळे व्यवसायाशी संबंधित बहुतेक कामे पूर्ण करता येतील. आरोग्य उत्तम राहील.

मकर : तुम्ही बराचसा वेळ वैयक्तिक आणि आवडीच्या कामात व्‍यतित कराल

तुम्ही तुमचा बराचसा वेळ तुमच्या वैयक्तिक आणि आवडीच्या कामात व्‍यतित कराल, असे श्रीगणेश म्‍हणतात. कोणत्याही परिस्थितीत संतुलन राखाल. नातेवाईक आणि जवळच्या व्यक्तींशी संबंधित अप्रिय घटनेमुळे निराशा जाणवेल.खोकला, ताप आणि विषाणूजन्य समस्या जावणू शकतात.

कुंभ : जवळचा नातेवाईक किंवा मित्र तुमची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करू शकतो.

श्रीगणेश सांगतात की, आज सामाजिक सेवा संस्थेबद्दल सहकार्याची भावना दृढ होईल. यामुळे मानसिक आणि आध्यात्मिक शांती मिळेल. जवळचा नातेवाईक किंवा मित्र तुमची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करू शकतो. व्यवसायात आर्थिक बाबींचा अधिक विचार करावा लागेल.

मीन : कार्यक्षेत्रात अधिक समज आणि दूरदृष्टीने काम करण्याची गरज आहे.

आज जवळच्या नातेवाईकाशी एखाद्या विशेष विषयावर महत्त्‍वाच्‍या चर्चा होईल, असे श्रीगणेश म्‍हणतात. इमारत बांधकामाशी संबंधित महत्त्वाचे निर्णय घेऊ शकता. गैरसमजामुळे मनात निराशेची स्थिती राहील. कार्यक्षेत्रात अधिक समज आणि दूरदृष्टीने काम करण्याची गरज आहे.

Back to top button