नाशिक : नांदूरशिंगोटे येथे ग्रामस्थांच्या सतर्कतेनंतर दरोड्याचा प्रयत्न फसला | पुढारी

नाशिक : नांदूरशिंगोटे येथे ग्रामस्थांच्या सतर्कतेनंतर दरोड्याचा प्रयत्न फसला

नाशिक (नांदूरशिंगोटे) : पुढारी वृत्तसेवा
नांदूरशिंगोटेकरांना गेल्या दहा ते बारा दिवसांपासून दररोजच चोरट्यांचा सामना करण्याची वेळ आलेली आहे.

गावानजीक इंद्रायणी लॉन्सच्या पाठीमागील बाजूस शिवाजी पांडुरंग आव्हाड यांनी नुकताच बंगला बांधला आहे. बुधवारी (दि. 2) मध्यरात्री 1.40 च्या सुमारास चार ते पाच जणांनी चोरीच्या उद्देशाने बंगल्यात प्रवेश केला. मात्र, स्वाती आव्हाड यांना जाग आली असता बंगल्याचा दरवाजा व खिडकी उघडण्याचा प्रयत्न करत असल्याचे लक्षात आले. तिने जवळच बंगल्यावर झोपलेल्या शुभम आव्हाड यास मोबाइलवरून चोर आल्याचे सांगितले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन शुभम व त्याचे वडील बाळासाहेब आव्हाड, रमेश आव्हाड यांनी त्वरित बाहेर येऊन गॅलरीतून बघितले असता समोरच त्यांच्या भावाच्या बंगल्याच्या बाहेर चार ते पाच जण उभे दिसले. त्यांनी चोर चोर असा आवाज देऊनही ते काही तिथून जाण्याचे नाव घेत नव्हते. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन स्वातीकडे मदतीचा फोन केल्यानंतर सरपंच गोपाळ शेळके व ग्रामस्थांनी तिकडे धाव घेतली. ग्रामस्थांना पाहून चोरटे अंधाराचा फायदा घेऊन फरार झाले.

हेही वाचा:

Back to top button