नाशिक : जिल्हा परिषदेसमोर अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा ठिय्या | पुढारी

नाशिक : जिल्हा परिषदेसमोर अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा ठिय्या

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा

नाशिक जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघटना सीटूच्या वतीने जिल्ह्यातील अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी ठिय्या आंदोलन केले. यानंतर किमान वेतन, नवीन मोबाइल, ग्रॅज्युटी, शासकीय दर्जा मिळणे, पोषण आहार ट्रॅक ॲप मराठीत करणे आदी मागण्यांचे निवेदन उपमुख्यधिकारी दीपक चाटे यांना देण्यात आले. सीटूचे जिल्हाध्यक्ष सीताराम ठोंबरे, जिल्हा सरचिटणीस देवीदास आडोळे, अंगणवाडी युनियनच्या जिल्हाध्याक्ष सुलोचना ठोंबरे, कल्पना शिंदे, लता डावरे, सुरेखा पवार, सुनीता मोगल, सीता गवळी, यशोदा ब्राह्मणे, आशा पवार, तुकाराम सोनेज, हिरामण तेलोरे, संजय पवार, निवृत्ती केदार यांच्यासह महिला कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले होते.

हेही वाचा:

Back to top button