नाशिक : दुचाकी घसरून वृद्ध ठार | पुढारी

नाशिक : दुचाकी घसरून वृद्ध ठार

नाशिक : दुचाकी घसरून झालेल्या अपघातात ६५ वर्षीय वृद्ध ठार झाल्याची घटना सोमवारी (दि.३१) सायंकाळी घडली. शिवाजी जगदिश बोरसे (६५, रा. जाधव संकुल, सातपूर) असे या वृद्ध व्यक्तीचे नाव आहे. शिवाजी बोरसे हे त्यांच्या दुचाकीवरून जात असताना सायंकाळी सातच्या सुमारास दुचाकीवरून पडले. त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा :

Back to top button