Chiranjeevi : सामंथाच्या आजारपणावर चिरंजीवीचे हृदयस्पर्शी ट्विट | पुढारी

Chiranjeevi : सामंथाच्या आजारपणावर चिरंजीवीचे हृदयस्पर्शी ट्विट

पुढारी ऑनलाईन डेस्क : साऊथ अभिनेत्री सामंथा रुथ प्रभू ही गेल्या काही काळापासून मायोसायटिस या गंभीर आजाराशी झुंज देत आहे. गेल्या शनिवारी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून तिने या आजाराविषयीची स्वत: माहिती दिली होती. यानंतर तिच्या फॅन्ससह बॉलिवूड, साऊथ आणि इतर कलाकार ती लवकरात -लवकर बरी व्हावी यासाठी प्रार्थना करत आहेत. याच दरम्यान साऊथ इंडस्ट्रीतील मेगास्टार चिरंजीवीने ( Chiranjeevi) सामंथाला धीर देताना एक हृदयस्पर्शी ट्विट केले आहे.

साऊथ अभिनेता चिरंजीवीने ( Chiranjeevi) नुकतेच एक ट्विटर शेअर करत सामंथाला या आजारातून तू लवकर बरी होशील असा धीर दिला आहे. यात त्याने लिहिले आहे की, ‘प्रिय सॅम, अनेक वेळा आपल्या आयुष्यात वेगवेगळे आव्हाने येत असतात, जी आपल्याला आपली आंतरिक शक्ती शोधण्यात मदत करतात. सामंथा तू आंतरिक शक्ती असलेली अद्भुत मुलगी आहेस. मला खात्री आहे की, लवकरच तू या आजारावरही मात करशील आणि धैर्य दाखवशील, अशी मी आशा करतो. देव तुझा पाठीशी आहे. तू लवकरात- लवकर बरे व्हावी अशी माझी इच्छा आहे.’ असे त्याने म्हटले आहे.

चिरंजीवीच्या या ट्विटनंतर सामंथाने त्याचे आभार मानत लिहिले आहे की, ‘धन्यवाद सर तुमच्या प्रोत्साहन देणाऱ्या शब्दांबद्दल.’ चिरंजीवीसोबत दुलकर सलमान, ज्युनियर एनटीआर, लक्ष्मी मांचू, श्रिया सरन, जान्हवी कपूर आणि हंसिका मोटवानी यांसारख्या इतर अनेक कलाकारांनी सामंथाला लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

सामंथा ( Samantha Ruth Prabhu) गेल्या शनिवारीच सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती. यात तिने स्वत: ला काही दिवसांपासून मायोसायटिस नावाच्या एका गंभीर आजाराचे निदान झाल्याचे सांगितले होते. पहिल्यादा सामंथाला आपण लवकर बरे होवू असे वाटले होते. परंतु, अजूनही ती डॉक्टरांच्या देखरेखीखाली असल्याचे समजते.

हेही वाचलंत का? 

Back to top button