Suhas Kande : बंजारा तांड्याचा विकास करण्यासाठी कटीबद्द | पुढारी

Suhas Kande : बंजारा तांड्याचा विकास करण्यासाठी कटीबद्द

नाशिक (नांदगाव) : पुढारी वृत्तसेवा

माझ्या मतदार संघातील प्रत्येक बंजारा तांड्यावर दर्जेदार व्यायाम शाळा, वाचनालय, सभामंडप, पाणी पुरवठा योजना अंतर्गत पिण्याचे पाणी पोहचवत त्यांच्या विकासासाठी सदैव कटीबद्ध राहणार असल्याचे प्रतिपादन आमदार सुहास कांदे यांनी केले. तसेच अंजुम कांदे यांनी हाती घेतलेले तांड्यावरील महिलांसाठी शौचालय बांधण्याचे कार्य लवकरात लवकर पुर्ण करणार असल्याचे देखील कांदे म्हणाले.

बंजारा समाज्याचे आरध्य दैवत श्री. संत सेवालाल महाराजांच्या संगमरवरी ढाच्यातील मूर्तींचे सामूहिक पूजन-हवन, महंताच्या उपस्थितीत नांदगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात (दि. २) पार पडले. श्री संत सेवालाल महाराजांच्या मूर्ती आमदार कांदे यांनी स्वखर्चातून उपलब्ध करुन दिल्या. त्यामुळे श्रीक्षेत्र पोहरादेवी येथील उपस्थित महंतांनी यावेळी आमदार कांदे यांचे आभार मानले. या कार्यक्रमासाठी उपस्थित आसलेले श्री. क्षेत्र पोहरादेवी येथील महंत कबीरदासजी महाराज, जितेंद्रदासजी महाराज, रायसींगजी महाराज यांचा विशेष सत्कार व साखरेशी तुला आमदार कांदे यांच्या हातून करण्यात आली.  श्री. संत सेवालाल महाराजांच्या मूर्तीचे पूजन तसेच हवन यावेळी करण्यात आले.

यावेळी व्यासपीठावर बापूसाहेब कवडे, राजेश कवडे, विलास आहेर, राजेंद्र पवार, अंनत कासलीवाल, संतोष भोसले, आंकुश कातकडे, नंदु पाटिल, वाल्मिक हेबांडे, संजय काकळीज, दिलीप पगार, बाळा कंलत्री, समाधान पाटील, गणेश शिंदे, सुभाष कुटे, बबलु पाटील, नारायण पवार, रमेश काकळीज, अमोल नावंदर, अरुण पाटील, तेज कवडे, एकनाथ सदगीर, भाऊसाहेब सदगीर, गणेश चव्हाण, राजाभाऊ जगताप, विजु चोपडा, डाॅ. सुनिल तुसे, भास्कर कासार, कांतीलाल चव्हाण यांच्यासह विविध पक्षातील तसेच शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजू देशमुख यांनी केले तर आभार विलास आहेर यांनी मानले.

साखरेची तुला

पोहरादेवी येथील उपस्थित असलेले महंत कबीरदास महाराज, जितेंद्रजी महाराज, रायसींग महाराज यांची साखर तुला करत तुला केलेली साखर प्रसाद म्हणून वाटण्यात आली.

सर्प मित्रांचा सन्मान
तसेच तालुक्यातील सर्प मित्रांचा सन्मान करत त्यांना सर्प पकडण्यासाठी आवश्यक असलेले साहित्य आमदार कांदे यांच्या मार्फत देण्यात आले.

हेही वाचा :

Back to top button