नाशिक : दीडशे बेरोजगारांना मिळाली नोकरीची संधी | पुढारी

नाशिक : दीडशे बेरोजगारांना मिळाली नोकरीची संधी

नाशिक (सिन्नर): पुढारी वृत्तसेवा :
येथे घेण्यात आलेल्या महा रोजगार मेळाव्यात सुमारे 270 युवक-युवतींनी मुलाखती दिल्या. थेट मुलाखतीमधून विविध पदांसाठी 150 बेरोजगारांना तत्काळ निवड पत्र देऊन नोकरीची संधी मिळाली. माजी आमदार जनसेवक राजाभाऊ वाजे यांच्या मार्गदर्शनाखाली व माजी नगरसेवक सोमनाथ पावसे व मित्र परिवार यांच्या संकल्पनेतून तसेच महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज यांच्या सौजन्याने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी युवा नेते उदय सांगळे, माजी नगराध्यक्ष किरण डगळे, माजी नगरसेवक सोमनाथ पावसे, सामाजिक कार्यकर्त्या मेघा पावसे, अनिता मोरे, महाराष्ट्र चेंबरचे संचालक आशिष नहार, संजय राठी, कैलास आहेर, मिलिंद राजपूत, रतन पडवळ, बबन वाजे, उद्योजक नीलेश काकड, रावसाहेब आढाव आदींसह नामांकित कंपन्यांचे अधिकारी उपस्थित होते. विजय चकोर यांनी प्रास्ताविक केले. संजय नन्नवरे यांनी सूत्रसंचालन केले. मेळावा यशस्वीतेसाठी सुभाष चव्हाणके, नितीन मुटकुळे, प्रफुल्ल आव्हाड, विकास गडाख, मनोज सदगीर, विठ्ठल जाधव, उत्तम घरे, प्रफुल्ल जाधव, किरण पवार, जितेंद्र शिंदे आदींनी परिश्रम घेतले.

45 कारखाने सहभागी – रिंग प्लस अक्वा, महिंद्रा अँड महिंद्रा, महिंद्रा सीआयई, तपारिया टूल्स, एमएसएस इंडिया, पिंपल्स पायपिंग, सॅमसोनाइट बेअरिंग, ओके फर्न, रोज इंडस्ट्रीज, आरपीएफ, नोबेल हायजिन, वैष्णवी ऑटो, शिवसागर हॉटेल, मदरसन ऑटोमोटिव्ह यासह माळेगाव, मुसळगाव, गोंदे, इगतपुरी व नाशिक येथील 45 कारखान्यांद्वारे दहावी, बारावी, आयटीआय, डिप्लोमा, इंजिनिअर, पदवीधर झालेल्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या.

हेही वाचा :

Back to top button