दोन दुचाकी चोरांना पकडले; तब्बल 20 दुचाकी जप्त | पुढारी

दोन दुचाकी चोरांना पकडले; तब्बल 20 दुचाकी जप्त

कोपरगाव : पुढारी वृत्तसेवा

शहर पोलिस ठाण्याअंतर्गत शहर पोलिस निरीक्षक यांच्या पथकाने धडाकेबाज कामगिरी करीत गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे दोन दुचाकी चोरांच्या मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून सुमारे 8 लाख 30 हजार रुपये किंमतीच्या विविध कंपनीच्या 20 दुचाकी जप्त केल्या आहेत.

सातारा : कार्यालये, निवासस्थाने दुरुस्तीत भ्रष्टाचार

पोलिसांनी या गुन्ह्यात गोविंद संजय शिंदे (21) (रा. बेट ता. कोपरगाव) व आशिष राम मिलन कोहरी(रा. पुणतांबा चौफुली, कोपरगाव मूळ राहणार मंगोली जिल्हा अमेठी उत्तर प्रदेश ) या दोघांना अटक केली. त्यांनी आपण नाना पानसरे (रा.कोपरगाव, पूर्ण नाव माहीत नाही) याच्या साथीने ठिकाणाहून दुचाकी, अ‍ॅक्टिवा, स्कूटी अशी एकूण 20 वाहने चोरी केली आहेत. या दोन्ही आरोपींना अटक केली आहे, तर तिसरा आरोपीचा नाना पानसरे यांचा शोध सुरू आहे.

बिबटे आणि गावकरी ‘येथे’ राहतात गुण्यागोविंदाने

या चोरट्यांकडून शहर पोलिस स्टेशनच्या हद्दीतील व परिसरातील चोरीला गेलेल्या दुचाकीचे गुन्हे उघडकीस येणार असल्याची माहिती शहर पोलिस निरीक्षक वासुदेव देसले यांनी दिली. दरम्यान, दुचाकी चोरीला गेलेल्या मालकांनी कोपरगाव शहर पोलिस स्टेशनशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस निरीक्षक वासुदेव देसले यांनी केले आहे.

खोल समुद्रातील पाण्याचे वाढते आहे तापमान

या गुन्ह्याचा तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल राजेंद्र पुंड करीत आहेत. ही कामगिरी पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलिस अधीक्षक स्वाती भोर, उपविभागीय पोलिस अधिकारी संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक वासुदेव देसले, पोलिस हेडकॉन्स्टेबल राजेंद्र पुंड, पोलिस कॉन्स्टेबल, जे. पी. तमनर, पोलिस कॉन्स्टेबल संभाजी शिंदे, पोलिस कॉन्स्टेबल राम खारतोडे, पोलिस कॉन्स्टेबल गणेश काकडे या शहर पोलिसाच्या पथकाने केली आहे.

गुंतवणूक : निफ्टीचा गुरुमंत्र!

Back to top button