नाशिक : मोटार सायकल चोरी करणारे सराईत लासलगाव पोलिसांनी केले गजाआड | पुढारी

नाशिक : मोटार सायकल चोरी करणारे सराईत लासलगाव पोलिसांनी केले गजाआड

नाशिक (लासलगाव) : वार्ताहर
लासलगाव येथे गस्ती दरम्यान मोटारसायकल चोरी करणाऱ्या दोन सराईत चोरट्याना पकडण्यात यश आल्याची माहिती सहा. पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांनी दिली. भुषण सुधाकर धोदमल आणि मयूर विलास गरड यांना ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोघांनाही पोलीस कोठडी सुनावली आहे.
सोहमनगर येथील रहिवासी नजीर ईस्माईल शेख यांच्या फिर्यादीवरून भादवि कलम ३७९ प्रमाणे मोटार सायकल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून मोटार सायकल चोरीच्या घटनेत वाढ होत असल्याने या गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी पोलिस अधीक्षक सचिन पाटील, अपर पोलीस अधीक्षक माधुरी केदार कांगणे, उपविभागीय पोलीस अधिकारी (निफाड) सोमनाथ तांबे यांनी केलेल्या मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे लासलगाव पोलीस ठाणे  हद्दीत दररोज गस्तसाठी साध्या वेशात पोलीस पथक तयार करण्यात आलेले आहे.
हे पथक दि. (१७) लासलगाव शहरात गस्त घालत असताना त्यांना रेकॉर्डवरील गुन्हेगार भुषण धोदमल हा त्याच्या साथीदारासह लासलगाव शहरात मोटार सायकलवर फिरत असल्याचे समजल्याने त्यांनी सदर मोटार सायकल स्वारास शोधून मोटारसायकलच्या कागदपत्रांविषयी विचारपुस केली असता त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली.  पोलिसांनी भुषण सुधाकर धोदमल (२५)  रा. सोहमनगर, लासलगाव आणि मयूर विलास गरड  (२०) रा. कॉलेज रोड, लासलगाव यांना ताब्यात घेऊन चौकशी केली.  त्यांनी मोटारसायकल चोरी केली असल्याची कबुली दिली.
सहायक पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अजिनाथ कोठाळे, सपोउनि शिवाजी घोडे, पोलीस हवालदार कैलास महाजन, पोलीस नाईक योगेश शिंदे, वाडीलाल जाधव व पोकॉ प्रदिप आजगे, कैलास मानकर, पोलीस नाईक देविदास पानसरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

 हेही वाचा :

Back to top button