नाशिक : घरासमोर पार्क केलेल्या दोन दुचाकी पेटविल्या | पुढारी

नाशिक : घरासमोर पार्क केलेल्या दोन दुचाकी पेटविल्या

नाशिक : अज्ञात समाजकंटकांनी घरासमोर उभ्या केलेल्या दुचाकी पेटविल्याचा प्रकार नाशिक-पुणे महामार्गावरील पंचशील नगर परिसरात घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजय संजय दोंदे (२३, रा. गांगुर्डे चौक, पंचशीलनगर, शिवाजीनगर) यांनी घरासमोर पार्क केलेल्या दोन दुचाकी अज्ञात समाजकंटकांनी पहाटेच्या सुमारास आग लावून पेटवून दिल्या. या घटनेत दुचाकीचे नुकसात झाले आहे. याप्रकरणी उपनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा :

Back to top button