पिंपरी : शहरात रसदार लिची दाखल | पुढारी

पिंपरी : शहरात रसदार लिची दाखल

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : लिची रसाळ फळ पाहताच अनेकांना आस्वाद घेण्याचा मोह आवरत नाही. अशा रसदार लिचीची आवक कोलकात्याहून फळ बाजारात सुरू झाली आहे. शहरात देखील लिची मिळत आहे.

चिमुकलीने मांजरीचे पिल्लू समजून बिबट्याचा बछडा आणला घरी

सध्या बाजारात दाखल झालेल्या लिचीची चव आंबट-गोड अशी आहे. फळबाजारात कोलकात्याहून दहा ते बारा हजार किलो लिचीची आवक झाली आहे. प्रतवारीनुसार लिचीच्या नऊ किलोच्या खोक्याला आठशे ते चौदाशे रुपये असा भाव मिळत आहे.

‘द काश्मीर फाईल्स’ नंतर पुन्हा दिसणार काश्मिरी पंडितांच्या व्यथा, नवा चित्रपट प्रदर्शनास सज्ज

मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लिचीची आवक सुरू होते. लिचीचे उत्पादन पश्चिम बंगालमध्ये मोठ्या प्रमाणावर होते. कोलकाता आणि बिहारमधील मुझ्झफरनगर भागातील लिची उत्पादक शेतकरी व विक्रेत्यांच्या माध्यमातून संपूर्ण देशभरात लिची विक्रीसाठी पाठवली जाते.

तर ओवेसीला औरंगजेबाकडे पाठवतो, नितेश राणेंचा गंभीर इशारा

येत्या काही दिवसांत लिचीची आवक आणखी वाढेल. लिचीचा हंगाम जून महिन्यापर्यंत सुरू राहतो. सध्या येत असलेली लिची आंबट-गोड असली तरी आवक वाढल्यानंतर गोड लिचीचे प्रमाण वाढेल.

लिचीचा हंगाम बहरात आल्यानंतर
फळ बाजारात दररोज पंधरा ते वीस हजार किलो लिचीची आवक होईल. लिचीचा हंगाम 20 जूनपर्यंत सुरू राहील.
– अनिल परदेशी, विक्रेते

Back to top button