नाशिक : सिटीलिंकतर्फे आजपासून महिलांसाठी स्वतंत्र बस | पुढारी

नाशिक : सिटीलिंकतर्फे आजपासून महिलांसाठी स्वतंत्र बस

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक महानगर परिवहन महामंडळाच्या सिटीलिंक बससेवेतर्फे मंगळवार (दि.26)पासून महिलांसाठी स्वतंत्र बससेवा सुरू करण्यात येणार असून, एकूण तीन मार्गांवर आठ फेर्‍यांद्वारे या बससेवेचा लाभ महिला प्रवाशांना घेता येणार आहे.

मार्ग क्रमांक 101 ही बस सकाळी 9 वाजता गंगापूर गाव ते निमाणीमार्गे बारदान फाटा, सातपूर, जिल्हा रुग्णालय, निमाणी अशी असेल. तसेच निमाणी ते गंगापूर गाव मार्गे जिल्हा रुग्णालय, सातपूर, बारदान फाटा, गंगापूर गाव ही बस सायंकाळी 6 वाजता असेल. बस क्रमांक 103 ही बस सकाळी 9.25 वाजता अंबड गाव ते निमाणीमार्गे सिम्बायोसिस, उत्तमनगर, पवननगर, निमाणी तसेच सायंकाळी 6 वाजता निमाणी ते अंबडगावमार्गे पवननगर, उत्तमनगर, सिम्बायोसिस कॉलेज, अंबडगाव या मार्गाने बससेवा उपलब्ध असेल.

मार्ग क्रमांक 266 ही बस सकाळी 9.30 वाजता नाशिकरोड ते निमाणीमार्गे द्वारका, शालिमार, सीबीएस, निमाणी, नाशिकरोड, सायंकाळी 6 वाजता नाशिकरोड ते निमाणीमार्गे द्वारका, शालिमार, सीबीएस, निमाणी तर याच कालावधीत पुन्हा त्याच मार्गाने महिला विशेष बससेवा उपलब्ध राहणार आहे. या बससेवेचा महिला प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सिटीलिंकतर्फे करण्यात आले आहे.

हेही वाचा :

Back to top button