नाशिक : मनपाच्या प्रबोधनकार ठाकरे उद्यानाची वाताहत | पुढारी

नाशिक : मनपाच्या प्रबोधनकार ठाकरे उद्यानाची वाताहत

नाशिक (सातपूर) : पुढारी वृत्तसेवा
प्रभाग क्र. 8 मधील आनंदवलीतील स्व. प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे उद्यानाची पुरती दुरवस्था झाली आहे. सुमारे 4 ते 5 एकर परिसरात गोदावरीच्या काठावर साकारलेले हे भव्य उद्यान देखभालीअभावी वाताहत झाली आहे.

या उद्यानात जॉगिग ट्रॅक, कारंजा, बसण्याचे बाकडे, खेळणी, लॉन, वाढलेले गजर गवत, खाद्यपदार्थ विक्रीगृह, सभागृह, सभामंडप, स्वागतकक्ष यांची दुरवस्था झालेली आहे. या ठिकाणी सध्या घाणीचे साम—ाज्य पसरले असून, अनेक साहित्य चोरीला गेले आहे. उद्यान परिसरात ठिकठिकाणी मद्याच्या बाटल्या, दारूडे, प्रेमीयुगुलाचा वावर दिसून येतो. रात्रीला तर उद्यानात टवाळखोरांचा मेळावा भरत असल्याचे चित्र दिसून येते. या उद्यानाकडे महापालिका प्रशासन, उद्यान विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. उद्यानाला बकाल स्वरूप आले आहे. परिसरातील नागरिकांनी उद्यानाच्या दुरुस्तीची मागणी केली आहे.

10 वर्षांपूर्वी हे उद्यान म्हणजे परिसरातील एक सुंदर ठिकाण होते. सकाळी व सायंकाळी नागरिकांची गर्दी होत होती. मात्र, उद्यान देखभालीकडे महापालिकेने दुर्लक्ष केले. एकीकडे नवीन उद्याने तयार करत आहेत, तर दुसरीकडे पूर्वीच्या उद्यानाकडे पुरते दुर्लक्ष केले जात आहे.
– सुरेखा लोखंडे, स्थानिक रहिवासी, आनंदवली

उद्यानाची देखभाल करण्याचे महापालिकेचे कर्तव्य होते. तत्कालीन आयुक्तांकडे पाठपुरावा केला होता. परंतु, त्यांची बदली झाली. पाठपुरावा करून गोदावरी परिचय उद्यान विकास केला. त्याच धर्तीवर स्व. ठाकरे उद्यानाचा विकास करण्यात येणार आहे.
– विलास शिंदे, माजी नगरसेवक तथा शिवसेना गटनेते

हेही वाचा :

Back to top button