ॲड. गुणरत्न सदावर्तेंना ताब्यात घेण्यासाठी कोल्हापूर पोलिसांचे पथक मुंबईत | पुढारी

ॲड. गुणरत्न सदावर्तेंना ताब्यात घेण्यासाठी कोल्हापूर पोलिसांचे पथक मुंबईत

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा ॲड. गुणरत्न सदावर्ते यांना ताब्यात घेण्यासाठी कोल्हापूर येथील शाहुपूरी पोलिसांचे विशेष पथक आज (मंगळवार) सकाळी मुंबईत दाखल झाले. मुंबई येथील न्यायालयाच्या आदेशानंतर दुपारी त्यांचा ताबा घेण्यात घेणार आहे. आज रात्रीपर्यंत सदावर्ते यांना पोलीस बंदोबस्तात कोल्हापूरला आणण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

सकल मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक दिलीप पाटील (कोल्हापूर) यांनी ॲड. सदावर्ते यांच्या विरुद्ध शाहूपुरी पोलिस ठाण्यात दोन दिवसांपूर्वी गुन्हा दाखल केला आहे.सदावर्ते यांनी मराठा आरक्षणाला सातत्याने विरोध करून मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. शिवाय मराठा आणि मागासवर्गीय समाज यांच्या तेढ निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला आहे. चिथावणीखोर वक्तव्य करून सामाजिक सलोख्याला बाधा निर्माण करण्याचा सदावर्तेंचा प्रयत्न सामाजिक सलोख्याला बाधा निर्माण करणारा आहे, असेही दिलीप पाटील यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

सदावर्ते यांना आठवड्यापूर्वी सातारा पोलिसांनी अटक केली होती. सोमवारी त्यांच्या न्यायालयीन कोठडीत आदेश झाला होता. सायंकाळी त्यांना मुंबईतील कारागृहात हलविण्यात आले. ॲडव्होकेट सदावर्तेंना ताब्यात घेण्यासाठी शाहूपुरी पोलिसांचे विशेष पथक रात्री उशिरा मुंबईकडे रवाना झाले. ताबा घेण्यासाठी न्यायालयाकडे रीतसर मागणी करण्यात येईल. न्यायालयाच्या आदेशानंतर ॲडव्होकेट सदावर्तेंचा ताबा घेऊन हे पथक आज रात्री उशिरा पर्यंत कोल्हापुरात दाखल होईल, असेही सूत्रांनी स्‍पष्‍ट केले.

हेही वाचा : 

Back to top button