Sambhajiraje Chhatrapati संतापले, आमचा लढा आम्ही पुन्हा सुरू करू!

sambhajiraje chatrapati  यांनी राज्यशासनाला सवाल उपस्थित केला आहे
sambhajiraje chatrapati यांनी राज्यशासनाला सवाल उपस्थित केला आहे
Published on
Updated on

कोल्हापूर : पुढारी ऑनलाईन : संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाच्या न्याय्य मागण्यांसाठी केलेल्या मूक आंदोलनाची राज्य शासनाने दखल घेत (दि.१७) जूनला बैठक घेतली. या बैठकीत मराठा समाजाच्या मागण्या शासनस्तरावर मान्य केल्या आल्या. त्यांच्या पूर्ततेसाठी प्रशासनाने कालावधी मागितला होता. मात्र एक महिना पूर्ण होऊन देखील प्रशासनाने कार्यवाही केलेली नाही. याबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व उपसमितीच्या सदस्यांना संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी सवाल उपस्थित केला आहे.

संभाजीराजेंचे राज्य शासनाला पत्र

संभाजीराजे यांनी राज्य शासनाला पत्र पाठवले आहे.

या पत्रात संभाजीराजे म्हणतात, सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाचे शैक्षणिक व शासकीय नोकऱ्यांमधील आरक्षण रद्द केले.

मराठा समाजास शैक्षणिक व आर्थिकदृष्ट्या सक्षम करणाऱ्या काही मागण्या समाजामार्फत आम्ही राज्य शासनाकडे मांडल्या होत्या.

अधिक वाचा : 

आरक्षणाइतक्याच या मागण्या महत्त्वपूर्ण असून या मागण्यांच्या पूर्ततेनंतर मराठा समाजाच्या सर्वांगीण उन्नतीस हातभारच लागणार आहे.

या मागण्या पूर्ण करण्यासाठी समाजास वेठीस न धरता थेट लोकप्रतिनिधींची भूमिका जाणून घेण्यासाठी आम्ही मूक आंदोलनाचा पर्याय निवडला.

मूक आंदोलनानंतर राज्यशासनाची बैठक

१६ जून रोजी कोल्हापूर येथे झालेल्या मूक आंदोलनानंतर राज्य शासनाने आम्हाला मागण्यांबाबत निर्णय घेण्यासाठी बैठकीस निमंत्रित केले. दि. १७ जून रोजी सह्याद्री अतिथीगृह येथे झाली. बैठकीस मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मराठा आरक्षण मंत्रीमंडळ उपसमितीचे अध्यक्ष व सदस्य मंत्रीगण, राज्याचे महाधिवक्ता यांचेसह राज्यातील प्रमुख समन्वयक व संबंधित सर्व शासकीय विभागांचे मुख्य सचिव व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

अधिक वाचा : 

या बैठकीत समाजाच्या प्रमुख मागण्यांविषयी सविस्तर व सकारात्मक चर्चा झाली. उपस्थित मंत्रिगणांनी समाजाच्या मागण्यांबाबत सकारात्मक प्रतिसाद दर्शविला.

प्रशासकीय अधिकाऱ्यांनी त्यानुसार कार्यवाही करून मागण्यांची पूर्तता करणेबाबत आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करणेसाठी कालावधी मागितला होता.

खासदार संभाजीराजे यांनी राज्यसरकारला पत्रातून सवाल उपस्थित केला.
खासदार संभाजीराजे यांनी राज्यसरकारला पत्रातून सवाल उपस्थित केला.

एक महिन्याच्या अवधी संपत आला तरी निर्णय नाही

याबाबत राज्य शासनाच्यावतीने करण्यात आलेल्या विनंतीनुसार आम्ही नियोजित मूक आंदोलन एक महिना पुढे ढकलले होते. हा एक महिन्याचा अवधी संपत आला आहे.

राज्य शासनाने बैठकीत घेतलेल्या निर्णयांची पूर्तता व अंमलबजावणी करणेसाठी प्रशासनाने कोणतीही ठोस कार्यवाही केल्याचे दिसून येत नाही.

अधिक वाचा : 

राज्य शासनाने समाजाच्या बहुतांश मागण्या मान्य जरी केल्या असल्या, तरी प्रशासनाच्या बेपर्वाईमुळे यावर अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही.

तरी, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष व सदस्य मंत्री यांनी या सर्व परिस्थितीचा गांभिर्याने विचार करून, संबंधित सर्व प्रशासकीय विभागांकडून मागण्यांबाबत झालेल्या निर्णयांचा कार्य अहवाल त्वरीत मागवून या मागण्या मार्गी लावून त्यांची तात्काळ प्रभावी अंमलबजावणी करावी, अन्यथा आमचा लढा आम्ही पुन्हा सुरू करू, असा सवाल खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केला आहे.

हे ही वाचा :

हे ही पाहा : 

[visual_portfolio id="7246"]

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news