

मुंबई, पुढारी ऑनलाईन : महाराष्ट्र एसएससी निकाल २०२१ महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) या आठवड्याच्या अखेरीस जाहीर करण्याची शक्यता आहे.
एसएससी निकाल २०२१ संबंधी अधिकृत तारीख आणि वेळ कोणती असेल, याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिलेली नाही. जुलै महिन्यात हे निकाल लागतील, असं संकेत शासनाकडून देण्यात आले होते.
यापूर्वी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी १५ जुलैपर्यंत दहावीचा निकाल जाहीर करण्यास असल्याचे सांगितलेले होते. कोरोनामुळे एसएससी बोर्डाची २०२१ ची परीक्षा रद्द करण्यात आली होती.
सूत्रांकडून आलेल्या माहितीनुसार यंदा निकालासाठी राज्य शिक्षण विभागानं 'मूल्यांकन' असा एक पर्याय आणला आहे. यंदाची एसएससी निकाल २०२१ हा २३ जुलैपर्यंत जाहीर केले जाण्याची शक्यता आहे. माध्यमांमधील विविध बातम्यांचा विचार केला, तर दहावी-बारावी निकाल पुढे ढकलण्याची शक्यता आहे. दहावी २३ जुलैपर्यंत होणं अपेक्षित आहे.
मूल्यांकन कसं होणार?
यंदा राज्य शिक्षण विभागानं निकालाच्या गणितासाठी पर्यायी मुल्यांकन निकष लावले आहेत. महाराष्ट्र वर्ग दहावीच्या मूल्यांकन निकषानुसार, वर्ग 9 ची वार्षिक परीक्षा आणि दहावीच्या अंतर्गत मूल्यांकन, युनिट टेस्ट आणि प्री-बोर्ड मधील विद्यार्थ्यांच्या कामगिरीच्या आधारे निकाल मोजला जाईल.
इंटरनेवर निकाल कसा तपासाला?
पहा व्हिडीओ : अभिनेते सचिन खेडेकर यांच्याशी खास गप्पा
हे वाचलंत का?