इंग्लंड दौऱ्यावरील टीम इंडिया कोरोना संकटात, एक खेळाडू पॉझिटिव्ह | पुढारी

इंग्लंड दौऱ्यावरील टीम इंडिया कोरोना संकटात, एक खेळाडू पॉझिटिव्ह

लंडन; पुढारी ऑनलाईन : टीम इंडिया संघावर कोरोना संकट ओढावले आहे. इंग्लंड दौऱ्यावरील एका खेळाडूचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर टीम इंडिया मधील एका खेळाडूची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. तर कोरोना बाधित खेळाडूला त्याच्या नातेवाईकाच्या घरी आयसोलेट केले आहे.

अधिक वाचा :

  • Kareena Kapoor ने धार्मिक भावना दुखवल्याप्रकरणी पोलिसांत तक्रार
  • क्रिकेट : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी नवे निय

इंग्लंड दौऱ्यातील भारतीय संघात २३ खेळाडूंचा समावेश आहे. त्यातील एकाची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. मात्र, खेळाडूचे नाव गुलदस्त्यातच ठेवण्यात आले आहे. तो कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटने संक्रमित असल्याची माहिती मिळाली आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या खेळाडूला कोरोनाची लागण झाली आहे; त्याला घसा दुखीचा त्रास जाणवत होता. पाझिटिव्ह आढळून आलेल्या खेळाडूच्या जे संपर्कात आले होते त्यांना तीन दिवसांसाठी आयसोलेट केले होते.

अधिक वाचा :

इंग्लंड विरुद्ध कसोटी मालिका ४ ऑगस्टपासून सुरु होणार आहे. त्यापूर्वीच भारतीय संघावर कोरोनाचे संकट ओढावले आहे. टीम मंडिया इंग्लंड विरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे.

दरम्यान, खेळाडू जुलैच्या मध्यात पुन्हा बायोबबलमध्ये परततली असे बीसीसीआयने याआधी स्पष्ट केलं होतं

टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये न्यूझीलंडकडून पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर टीम इंडिया आणि कर्णधार विराट कोहलीवर जोरदार टीका झाली.

अधिक वाचा :

इंग्लंडमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. हल्लीच इंग्लंडमध्ये खेळल्या गेलेल्या युरो कपच्या फायनलमध्ये इंग्लंडचा पराभव झाला. इंग्लंड फुटबॉल टीम हारल्यानंतर नाराज झालेल्या फॅन्सनी कोरोना नियमांचा फज्जा उडवला. इटलीने मिळवलेला विजय इंग्लिश चाहत्यांना पचवता आला नाही. वेम्बले स्टेडियमच्या बाहेर इंग्लिश आणि इटालियन फुटबॉल चाहत्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. पराभव पचवता न आल्याने इंग्लिश चाहत्यांनी उगचाच इटालियन फुटबॉलप्रेमींवर हल्ला केला. इंग्लिश चाहते फक्‍त इटालियन फुटबॉलप्रेमींवर हल्ला करूनच थांबले नाहीत, तर त्यांनी वर्णद्वेषी शेरेबाजीदेखील केली. त्यामुळे गोंधळ उडाला होता.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : “ब्रा आणि बुब्ज वर मी बोलले कारण…”

Back to top button