Lok Sabha Elections 2024 | ‘मविआ’चा जागावाटप फॉर्म्युला ठरला?; वरिष्ठ नेत्याने दिली माहिती | पुढारी

Lok Sabha Elections 2024 | 'मविआ'चा जागावाटप फॉर्म्युला ठरला?; वरिष्ठ नेत्याने दिली माहिती

पुढारी ऑनलाईन डेस्क : लोकसभा निवडणूक, २०२४ जागा वाटपासंदर्भातील मविआच्या नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक आज(दि.२९) पार पडली. दरम्यान, ‘मविआ’चा फॉर्म्युला ठरला असल्याची माहिती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी ‘पुढारी न्यूज’शी बोलताना दिली. ते बैठकीनंतर आज माध्यमांशी बोलत होते. (Lok Sabha Elections 2024)

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले आहे की, कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या या आकड्यात कोणीही जाऊ नये. उमेदवाराची क्षमता हा ‘मविआ’चा एकच फॉर्म्युला असल्याचेदेखील त्यांनी म्हटले आहे.

तसेच शिवसेना-२१, काँग्रेस-१५, शरद पवार गट-९ जागा लढवणार आहे. तर मित्रपक्षांना ३ जागा सोडणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. (Lok Sabha Elections 2024)

हेही वाचा:

Back to top button