खा. नवनीत राणा यांना जात प्रमाणपत्र देण्यास राज्य सरकारचा नकार

खा. नवनीत राणा यांना जात प्रमाणपत्र देण्यास राज्य सरकारचा नकार

मुंबई ः पुढारी वृत्तसेवा ;  अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा या पंजाब मधील शीख चर्मकार असल्यामुळे महाराष्ट्रात त्या जात प्रमाणपत्रावर दावा करू शकत नाहीत, असे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती जे के माहेश्वरी न्यायमूर्ती संजय करोल यांनी नोंदवले आहे.

संबंधित बातम्या 

त्याचप्रमाणे महाराष्ट्र सरकारनेही या निरीक्षणाला पुष्टी देणारी भूमिका घेतल्याने खा. राणा यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
खा. राणा या कोणत्याही अर्थाने मागासवर्गीय असल्याचे सिद्ध होत नाही. त्यांच्या शाळेपासून महाविद्यालयापर्यंतच्या कागदपत्रांवर शीख अशी नोंद आहे. त्यामुळे त्यांना यासंबंधीचे वैध प्रमाणपत्र दिले जाऊ शकत नाही, अशी भूमिका शासनाच्या वकिलांनी न्यायालयात मांडली.

नवनीत कौर यांनी रवी राणा यांच्याशी लग्न केल्यानंतर त्या अनुसूचित जातीच्या असल्याचे प्रमाणपत्र 2013 मध्ये मिळवले होते. त्याला 2017 मध्ये शिवसेनेचे तत्कालीन नेते आनंद अडसूळ यांनी न्यायालयात आव्हान दिले होते. यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने 2021 मध्येच खा. राणा यांचे जात प्रमाणपत्र रद्द केले होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news