कोयना धरण बुडीत क्षेत्रातील 25 बंधार्‍यांना शासनाची मान्यता | पुढारी

कोयना धरण बुडीत क्षेत्रातील 25 बंधार्‍यांना शासनाची मान्यता

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : राज्यात पिण्याच्या पाण्यासंदर्भातील टंचाईवर मात करण्यासाठी छोट्या बंधार्‍यांना प्राधान्य देण्यात यावे. राज्यभरात छोट्या बंधार्‍यांसाठी जागेची निश्चिती करण्यात यावी, असे निर्देश देतानाच सातारा जिल्ह्यातील कोयना धरण बुडीत क्षेत्रातील 25 बुडीत बंधार्‍यांना विशेष बाब म्हणून मान्यता देण्यात आल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. यामुळे महाबळेश्वर व जावली तालुक्यांतील गावांना भेडसावणार्‍या पाणी टंचाईवर उपाययोजना करणे शक्य होईल, असे ते म्हणाले.

कोयना धरण बुडीत क्षेत्रातील 25 बुडीत बंधार्‍यांबाबत बैठक मुख्यमंत्र्यांच्या गुरुवारी पार पडली. यावेळी मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, नियोजन विभागाचे प्रधान सचिव डॉ. रामास्वामी, मृद व जलसंधारण विभागाचे सचिव सुनील चव्हाण यांच्यासह विभागाचे अधिकारी उपस्थित होते. या बंधार्‍यांसाठी सुमारे 185 कोटी खर्च येणार आहे. या प्रस्तावित बंधार्‍यांची गावे कोयना जलाशयाच्या शेवटच्या भागात आहेत.

Back to top button