शेवाळे मानहानी प्रकरणात ठाकरे, राऊतांना दिलासा नाहीच | पुढारी

शेवाळे मानहानी प्रकरणात ठाकरे, राऊतांना दिलासा नाहीच

पुढारी ऑनलाईन डेस्क : उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना शेवाळे मानहानी प्रकरणाता दिलासा नाही. माझगाव न्यायालयाने त्यांची दोषमुक्तीची याचिका फेटाळली आहे.

संबंधित बातम्या – 

शिवसेनेत फूट पडल्यानंतर आमदार आणि खासदार हे मुख्यमंत्री शिंदेंसोबत गेले. यामध्ये खासदार राहुल शेवाळे होते. यानंतर सामना वृत्तपत्रातून खासदार राहुल शेवाळे यांच्यावर जोरदार टीका करत आरोप करण्यात आले होते. त्यानंतर शेवाळे यांनी उद्ध ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात माझगाव न्यायालयात मानहानीचा दावा दाखल केला होता. यानंतर या आरोपातून आपली दोषमुक्तता करण्यात यावी, यासाठीची याचिका ठाकरे आणि राऊत यांनी न्यायालयात दाखल केली होती, आज सुनावणी दरम्यान, माझगाव न्यायालयाने दोषमुक्तीची याचिका फेटाळली आहे.

Back to top button