बाबा महाराजांचे निधन, भरून न निघणारी सांस्कृतिक हानी : बावनकुळे | पुढारी

बाबा महाराजांचे निधन, भरून न निघणारी सांस्कृतिक हानी : बावनकुळे

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : आपल्या तल्लीन करणाऱ्या कीर्तनशैलीने वारकरी संप्रदायाचे विचार घराघरांत पोहोचविणारे बाबामहाराज सातारकर यांचे आपल्यातून निघून जाणे, ही न भरून निघणारी सांस्कृतिक हानी आहे, अशा शब्दात भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या.

ह.भ.प. बाबामहाराज सातारकर यांचे गुरुवारी २६ ऑक्टोंबर रोजी निधन झाले.जीवनात कितीही यशस्वी झालात तरी मी पणा नसावा. अखंड हरीनाम हेच आयुष्याचे सार आणि संचित आहे..” जगण्याचे इतके सोपे तत्वज्ञान सांगून, आपल्या तल्लीन करणाऱ्या कीर्तनशैलीने वारकरी संप्रदायाचे विचार घराघरांत पोहोचविणारे बाबामहाराज सातारकर यांचे आपल्यातून निघून जाणे, ही न भरून निघणारी सांस्कृतिक हानी आहे. श्रीविठ्ठलाचे कीर्तन आणि ज्ञानेश्वरीतील विचारधारा बाबामहाराजांनी सामान्यांपर्यंत अत्यंत सामान्य भाषेत पोहोचविली. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात त्यांचे नाव पोहोचले आहेच,पण त्यांच्या कीर्तन आणि प्रवचनाचे देशविदेशातही चाहते आहेत. बाबामहाराज हे प्रवाही लेखक, रसाळ कीर्तनकार आणि शास्त्रीय गायक होते. मला आठवते,काही दशकांपूर्वी बाबामहाराजांचे निरूपण दूरदर्शनवर असायचे. ते ऐकले की मन प्रसन्न होई. प्रेरणा, ऊर्जा आणि चैतन्य मिळे,आज हे हरपले अशी आदरांजली बावनकुळे यांनी अर्पण केली.

Back to top button