‘लोकसभेसोबत विधानसभेची निवडणूक नको’ | पुढारी

'लोकसभेसोबत विधानसभेची निवडणूक नको'

नरेश कदम

मुंबई :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील संघर्षाचा लोकसभा निवडणुकीत फटका बसू नये, यासाठी लोकसभेसोबत राज्यातील विधानसभेच्या निवडणुका घेण्याच्या प्रस्तावावर भाजपने फुल्ली मारली आहे. त्यामुळे केवळ लोकसभा निवडणुकीत ४८ पैकी ४० पेक्षा जास्त जागा जिंकण्याचे टार्गेट भाजपने ठरविले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या आमदारांच्या अपात्रतेबाबतची सुनावणी सध्या विधानसभा अध्यक्षांकडे सुरू आहे. ही सुनावणी निश्चित कालावधीत पूर्ण करण्यात यावी, याबाबत सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिले आहे. विधानसभा अध्यक्षांनी जरी शिंदे गटाच्या बाजूने निकाल दिला तरी त्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात ठाकरे गट आव्हान देईल. यात जर सर्वोच्च न्यायालयाने शिंदे गटाच्या आमदारांना अपात्र ठरविले तर लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिंदे यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यायला लागू शकतो. त्यानंतर तसाच गोंधळ
अजित पवार गटाच्या आमदारांच्याबाबत होवू शकतो. अशा बिकट परिस्थितीत लोकसभेच्या निवडणुकीला सामोरे जाणे अवघड
असेल. त्यामुळे लोकसभेसोबत विधानसभा निवडणुका एकत्र घेण्याचा प्रस्ताव भाजपच्या वरिष्ठ वर्तुळात चर्चेला जात होता. यात विधानसभा अध्यक्षांचा शिंदे गटाबाबत निकाल देण्यात आला की तातडीने विधानसभा करायची, आणि लोकसभेसोबत एकत्र निवडणुकीला सामोरे जात असल्याची घोषणा करण्याचा भाजपचा विचार होता.

तसेच विधानसभा बरखास्त करण्यात आली तर शिंदे आणि अजित पवार गटाच्या आमदारांच्या आपत्रतेचा विषय संपेल, अशी यामागची भाजपची रणनिती होती. परंतु अजित पवार हे राज्य सरकारमध्ये सामील झाल्यापासून शिंदे आणि अजित पवार गटात सतत खटके उडत आहेत. मंत्रिपदे, खाती, महामंडळे आणि आता पालकमंत्रिपदे यावरून शिंदे आणि अजित गट यांच्यात कलगीतुरा रंगला आहे.

अशा परिस्थितीत लोकसभेसोबत विधानसभा निवडणुका घेतल्या तर जागावाटपावरून रणकंदन होवू शकते. आणण्यासाठी प्रयत्न करेल आणि त्याचवेळेस परस्परांच्या जागा पाडण्यासाठी प्रयत्न होतील आणि लोकसभेच्या जागा निवडून आणण्याकडे दुर्लक्ष होईल, अशी भीती भाजपच्या धुरिणांना वाटत आहे.

  • शिंदे आणि अजित पवार गटाच्या आमदारांनी एकत्र निवडणुका घेवू नका, असे महायुतीच्या बैठकीत स्पष्ट केले होते. यावर भाजपच्या वरिष्ठ वर्तुळात बराच खल झाला. शेवटी लोकसभेसोबत विधानसभा निवडणुका घेण्याच्या आहे. प्रस्तावावर फुल्ली मारण्यात आली. महाराष्ट्रातून ४० पेक्षा जास्त जागा जिंकायच्या असल्याने अजित पवार गटाला महायुतीत सहभागी करून घेण्यात आले आहे. त्यामुळे केवळ लोकसभेवर लक्ष केंद्रित करायचे भाजपने ठरविले आहे.

Back to top button