बारसू रिफायनरी प्रकरणी चर्चेतून मार्ग काढा : शरद पवारांचा उदय सामंताना सल्‍ला | पुढारी

बारसू रिफायनरी प्रकरणी चर्चेतून मार्ग काढा : शरद पवारांचा उदय सामंताना सल्‍ला

पुढारी ऑनलाईन डेस्क : बारसू रिफायनरी प्रकरणी चर्चेतून मार्ग काढावा, असा  सल्ला मी उद्योगमंत्री उदय सामंत यांना दिला आहे. बारसू येथील जमीन सरकारने ताब्‍यात घेतलेली नाही केवळ माती परीक्षण सुरु आहे. तसेच बारसूमध्ये काम थांबवले आहे, अशी  उदय सामंत यांनी दिली आहे. रिफायनरीला स्थानिकांचा तीव्र विरोध असेल तर त्याची नोंद घेतली पाहिजे. असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज ( दि. २६) पत्रकार परिषदेत केलेली. (Barsu Refinery )

कोकणात रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर बारसू सोलगाव परिसरात क्रूड ऑइल रिफायनिंग करणारी ‘रत्नागिरी रिफायनरी व पेट्रोलियम उद्योग’ प्रस्तावित आहे. याला बारसू सोलगाव येथील स्थानिकांचा विरोध आहे. सोमवार(दि.२४) पासून या रिफायनरी संदर्भात ड्रिलिंग करून मातीचे परिक्षण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर बारसू सोलगाव येथील स्थानिकांनी जोरदार आंदोलन करत तीव्र विरोध केला. सोशल मीडियाच्या माध्यमातूनही याला जोरदार विरोध होत असताना दिसत आहे.

Barsu Refinery : स्थानिकांच्या भावनांची  नोंद घेतली पाहिजे

या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषदेत शऱद पवार म्हणाले, मी उदय सामंताकडून बारसू परिस्थितीवर आढावा घेतला  या प्रकरणी चर्चेतून मार्ग काढा असा  सल्ला सामंत यांना दिला आहे. बारसू स्थानिकांचे काही प्रश्न असतील तर ते सोडवले पाहिजेत. स्थानिकांना विश्वासात घेण गरजेच आहे. स्थानिकांचा विरोध होत आहे. त्यांचा विरोध का होत आहे. त्यापाठीमागील कारण शोधावी, यातून मार्ग काढायला हवा. जर  स्थानिकांच्या भावना एवढ्या तीव्र असतील तर त्याची नोंद घेतली पाहिजे, अशी अपेक्षाही त्‍यांनी व्‍यक्‍ती केली. उदय सामंत स्थानिकांची बैठक घेणार आहेत. काय तोडगा निघतो तो पाहू, असेही पवार यावेळी म्‍हणाले.

हेही वाचा 

 

Back to top button