Atiq-Ashraf murder case : उत्तर प्रदेश सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट | पुढारी

Atiq-Ashraf murder case : उत्तर प्रदेश सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट

पुढारी वृत्तसेवा, नवी दिल्ली : कुख्यात माफिया अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांच्या हत्या प्रकरणावर ( Atiq-Ashraf murder case ) येत्या शुक्रवारी सुनावणी होत आहे. या  पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारने सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल करीत आपली बाजूदेखील ऐकली जावी, अशी विनंती केली आहे.

अतिक आणि अशरफ यांच्या प्रयागराज येथे झालेल्या हत्योची न्यायालयीन चौकशी केली जावी, अशा विनंतीच्या काही याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या आहेत. १५ एप्रिल रोजी अतिक-अशरफ यांची पोलिसांसमोर गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. गोळीबार करणाऱ्या अरुण मौर्या, सनी आणि लवलेश तिवारी नावाच्या आरोपींना घटनास्‍थळीच अटक करण्यात आली होती. आरोपींनी १८ गोळ्या झाडल्या होत्या, यातील ८ गोळ्या अतिकला लागल्या होत्या. दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता.

हेही वाचा : 

Back to top button