Shiv Sena Name And Symbol : ‘शिवसेना’, ‘धनुष्यबाण’ शिंदे गटाचे; निवडणूक आयोगाने नेमका काय दिला निर्णय | पुढारी

Shiv Sena Name And Symbol : ‘शिवसेना’, ‘धनुष्यबाण’ शिंदे गटाचे; निवडणूक आयोगाने नेमका काय दिला निर्णय

मुंबई; पुढारी आनलाईन : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह कोणाचे या बाबतचा प्रलंबित असलेला निर्णय अखेर केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी (दि.१७) दिला. या बाबत सर्वोच्च न्यायालयातील अंतिम निर्णय येण्याच्या काही दिवसांआधी निवडणूक आयोगाने महत्त्वपुर्ण निकाल दिला आहे. आयोगाने निर्णय देताना शिवसेना हे पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे असल्याचा निर्णय दिला आहे. या निर्णयानंतर उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. आता या पक्ष कुणाचा याचा अंतिम निर्णय सर्वोच्च न्यायालय काय देणार याकडे संपूर्ण ठाकरे गटासह महाराष्ट्राचे असणार आहे. या संपूर्ण प्रकरणावर केंद्रीय निवडणूक आयोग काय म्हणाले ते सविस्तर जाणून घेऊया. (Shiv Sena Name And Symbol)

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह हे नेमके कोणाचे हा निर्णय देण्याआधी केंद्रीय निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना संबधीत पुरावे देण्यास सांगितले होते. दोन्ही गटाने आयोगाकडे आपले पुरावे सादर केले होते. सदर पुरावे सादर करताना दिरंगाई करण्यात आली होती. तसेच पुरावे सादर झाल्यानंतर परस्पर विरोधी गटांनी आक्षेप देखील नोंदवले होते. निवडणूक आयोगाने दोन्ही गटाचे पुरावे, सभासद संख्या, कार्यकारिणी, कार्यकारी मंडळ, पक्षघटना, पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या यासह इतर बाबींच्या तपशीलांचा आढावा घेतला. तसेच दोन्ही गटांनी सादर केलेल्या कागदपत्रांच्या पडताळणी नंतर निकालांच्या अनेक तारखांना पडल्यानंतर अखेर निवडणूक आयोगाने १८ फेब्रुवारी रोजी यासंदर्भातला ऐतिहासिक निकाल दिला आहे. या निकालात शिवसेना हे पक्षाचे नाव व पक्षाचे चिन्ह धनुष्यबाण हे मुख्यमंत्री एकनाथ ठाकरे गटाचे असल्याचा निकाल दिला आहे. या निकालानंतर राजकीय गटातून विविध प्रतिक्रीया येत आहे व एकंदरीत शुक्रवारी सायंकाळी नंतर एकूणच महाराष्ट्राचे राजकीय वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघाले आहे. (Shiv Sena Name And Symbol)

केंद्रीय निवडणूक आयोगाने निकालात काय म्हटले (Shiv Sena Name And Symbol)

  • शिवसेना पक्ष व चिन्हाबाबत निर्णय देताना केंद्रीय निवडणूक आयोग म्हणाले की, शिवसेना पक्षाने २०१८ साली शिवसेनेच्या घटनेत बदल केला. पण, हा बदल त्यांनी निवडणूक आयोगाला कळविला नाही.
  • शिवसेना या पक्षाची स्थापना शिवसेनापक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६६ रोजी केली. यानंतर त्यांनी १९९९ साली पक्षाच्या घटनेत त्यांनी बदल केला. यावेळी पक्षात पुर्वी असेलेल्या लोकशाही बाबतचे काही निकष बदलले. यानंतर बदल करण्यात आलेली पक्ष घटनेबाबत निवडणूक आयोगाला कळविण्यात आले व निवडणूक आयोगाची संमती घेतली.
  • शिवसेना पक्षाने २०१८ साली पक्षाची जी घटना बदलली त्या बाबत निवडणूक आयोगाला कळविण्यात आले नाही व त्या बाबतची संमती घेण्यात आली नाही.
  • निवडणूक आयोगाने निकाल देताना एक निरीक्षण नोंदवत म्हणाले की, शिवसेनेची सध्याची घटना अलोकतांत्रिक आहे. पदाधिकारी निवडताना एका गटाच्या लोकांना झुकते माप देण्यात आहे. एकाच गटाच्या लोकांची प्रमुखपदांवर करण्यात आलेल्या नियुक्त्या या लोकशाही विरोधी आहेत.
  • १९९९ साली शिवसेनेने घटना बदल करताना ज्या अलोकतांत्रिक निकषांना नाकारले होते. त्या निकषांचा पक्षाने पुन्हा २०१८ साली पक्ष घटनेत सामिविष्ठ करण्यात आला व यांची कल्पना व सहमती निवडणूक आयोगाकडून घेण्यात आली नाही व या प्रकरणी आयोगाला अंधारात ठेवण्यात आले.


अधिक वाचा :

Back to top button