शिंदेंची शिवसेना हीच खरी शिवसेना – देवेंद्र फडणवीस | पुढारी

शिंदेंची शिवसेना हीच खरी शिवसेना - देवेंद्र फडणवीस

पुढारी ऑनलाईन डेस्क : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालणाऱ्या एकनाथ शिंदेंना ‘शिवसेना’ हे नाव आणि ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह मिळाले आहे. आम्ही सुरुवातीपासून सांगत होतो की, एकनाथ शिंदेंची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे. शिवसेना ही खासगी मालमत्ता नाही. आम्हाला विश्वास होता, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

यापूर्वी वेगवेगळ्या पक्षांमध्ये अशी परिस्थिती निर्माण झाल्यांनंतर अशाच प्रकारे निर्णय देण्यात आले होते. मी मनापासून एकनाथ शिंदे यांचे मनापासून अभिनंदन करतो. ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायलयात जावे, हा त्यांचा अधिकार आहे, असे प्रत्युत्तरही देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे गटाला दिले आहे.

ते पुढे म्हणाले की,  बाळासाहेब यांच्या विचारांवर चालणाऱ्या शिंदे गटाला शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह मिळाल्याचा आनंद आहे. खरी शिवसेना शिंदे यांचीच आहे. एकनाथ शिंदे बाळासाहेबांचा विचार पुढे नेत आहेत. आमदार, खासदार यांच्या बहुमतावर या निर्णय देण्यात आला आहे. या देशात न्याय, कायदा, संविधान आहे. खासगी मालमत्ता म्हणून शिवसेनेचा वापर करण्यात आला. शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटालाच मिळणार याचा आधीपासूनच विश्वास आम्हाला होता. या निर्णयाविरोधात त्यांना न्यायालयात जावे की नाही हा त्यांचा निर्णय आहे, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांच्या विधानावर फडणवीस यांनी दिली.

Back to top button