रेल्वेने प्रवास करताय तर ही बातमी वाचाच! मध्य रेल्वे मार्गावर रविवारी ‘या’ ठिकाणी मेगा ब्लॉक | पुढारी

रेल्वेने प्रवास करताय तर ही बातमी वाचाच! मध्य रेल्वे मार्गावर रविवारी 'या' ठिकाणी मेगा ब्लॉक

पुढारी ऑनलाईन डेस्क : मध्य रेल्वे  हार्बर आणि ट्रान्सहार्बर मार्गावर उद्या रविवारी (दि. २२) मेगा ब्लॉक ( Mega block) असणार आहे. मेन लाईनवर मेगा ब्लॉक नाही. या संदर्भात मध्य रेल्वेच्या जनसंपर्क विभागाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून माहिती दिली आहे. ठाणे-वाशी/नेरुळ अप आणि डाउन ट्रान्सहार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० पर्यंत ‘मेगा ब्लॉक’ असणार आहे.

ठाणे येथून सकाळी १०.३५ ते सायंकाळी ४.०७ वाजेपर्यंत वाशी/नेरुळ/पनवेलसाठी सुटणाऱ्या डाउन मार्गावरील सेवा आणि वाशी/नेरुळ/पनवेल येथून सकाळी १०.२५ ते सायंकाळी ४.०९ वाजेपर्यंत ठाणे करिता सुटणाऱ्या अप मार्गावरील सेवा रद्द राहतील. तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – चुनाभट्टी/वांद्रे हार्बर मार्गावर सकाळी ११.४० ते सायंकाळी ४.४० पर्यंत आणि चुनाभट्टी/वांद्रे – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० पर्यंत असेल.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई/वडाळा रोड येथून सकाळी ११.१६ ते सायंकाळी  ४.४७ या वेळेत वाशी/बेलापूर/पनवेल करीता सुटणारी डाउन हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.४८ ते सायंकाळी ४.४३ वाजेपर्यंत वांद्रे/गोरेगाव करीता सुटणारी डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द  राहतील. पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी ९.५३ ते दुपारी ३.२० पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई/वडाळा रोडसाठी सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव/वांद्रे येथून सकाळी १०.४५ ते सायंकाळी ५.१३ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

दरम्यान, ब्लॉक कालावधीत पनवेल आणि कुर्ला (प्लॅटफॉर्म क्रमांक ८) दरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील. हार्बर मार्गावरील प्रवाशांना दि. २२.१.२०२३ सकाळी १०.०० ते सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत मुख्य मार्गावर आणि पश्चिम रेल्वे मार्गे प्रवास करण्याची परवानगी आहे. रविवार दि. २२.१.२०२३ मेन लाईनवर मेगा ब्लॉक नाही आहे. हे मेंटेनन्स मेगा ब्लॉक्स पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहेत. प्रवाशांना होणार्‍या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासन दिलगिरी व्यक्त केली आहे.

हेही वाचा :

Back to top button