Neelam Gorhe : नीलम गोऱ्हे शिंदे गटाच्या वाटेवर? | पुढारी

Neelam Gorhe : नीलम गोऱ्हे शिंदे गटाच्या वाटेवर?

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : आमदार आणि खासदारांपाठोपाठ काही पदाधिकारीही शिवसेनेला सोडचिठ्ठी देत असताना आता ठाकरे कुटुंबीयांच्या विश्वासू विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यासुद्धा शिंदे गटाच्या मार्गावर असल्याची चर्चा आहे. स्वत: गो-हे यांनी मात्र अशी शक्यता फेटाळली.

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे काही माजी नगराध्यक्ष, नगरसेवक आणि जिल्हा परिषदेचे पदाधिकारी शिंदे गटात प्रवेश करत आहेत. अशा स्थितीत मुंबईतील एका कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट झाल्यामुळे डॉ. गोहेसुद्धा ठाकरे गटाला सोडून शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा सुरू झाली.

यासंदर्भात डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, मी विधान परिषदेची उपसभापती आहे. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, लोकसभा अध्यक्ष या पदावरील व्यक्ती राज्यात आल्यानंतर त्यांची भेट घेणे हा राजशिष्टाचार आहे. लोकसभा अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला काही दिवसांपूर्वी मुंबईत आले तेव्हा राजशिष्टाचारानुसार आपण त्यांची भेट घेतली असता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसुद्धा उपस्थित होते. हा निव्वळ योगायोग होता. शासकीय कार्यक्रमात अशा भेटी होतच असतात. त्यावरून आपण शिवसेना सोडत असल्याच्या वावड्या उठवल्या गेल्या.

Back to top button