मंगळवेढा : वाळू माफियानी पोलीस कर्मचाऱ्याला चिरडले | पुढारी

मंगळवेढा : वाळू माफियानी पोलीस कर्मचाऱ्याला चिरडले

मंगळवेढा; पुढारी वृत्तसेवा: बेकायदेशीर वाळू वाहनाच्या धडकेत मंगळवेढा पोलीस स्टेशन येथील पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला.  गणेश प्रभू सोनलकर असे त्‍यांचे नाव आहे.

बेकायदेशीररित्या वाळू वाहतूक करणाऱ्या टेम्पोने शिरसी गोणेवाडी रोडवर थांबलेले साेनलकर यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने जोरदार धडक दिली.  ही घटना शनिवारी सकाळी पावणे दहा वाजण्याच्या सुमारास घडली.

पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू प्रकरणी टेम्पो चालक त्याचा साथीदार व मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची फिर्याद गोणेवाडीचे पोलीस पाटील संजय मेटकरी यांनी दिली आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की, पोलीस कॉन्स्टेबल गणेश सोनलकर हे कोर्टातील लोकअदालतीचे बजावणी केलेले समन्स फिर्यादीकडून कोर्टात जमा करण्यासाठी आले हाेते. शिरसी येथे हॅटसन डेअरीजवळ रस्त्याच्या कडेला स्वतःच्या दुचाकीवर ते थांबले होते.

याच दरम्यान या रस्त्यावरून पांढऱ्या रंगाची बिगर नंबरच्‍या टेम्पोमधून वाळू बेकायदेशीररित्या वाळू वाहतूक हाेत असल्‍याचे साेनलकर यांच्‍या निदर्शनास आले.

गणेश सोनलकर यांनी तातडीने वाहनाला थांबण्याचा इशारा केला.

वाहनचालक व त्याचा साथीदाराने वाळूने भरलेले टेम्‍पाे कॉन्स्टेबल सोनलकर त्यांच्या अंगावर घातला.

या धडकेत सोनलकर यांचा मृत्यू झाला. वाहन चालक व त्याचा साथीदार फरार झाले.  पोलिसांनी टेम्‍पाे ताब्यात घेतला आहे.

पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक विभागीय अधिकारी राजश्री पाटील यांनी मंगळवेढा पोलीस स्टेशन येथे भेट देऊन या घटनेची सविस्तर माहिती घेतली.

या गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील यांच्याकडे सपुर्त करण्यात आला आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button