

जळगाव ; पुढारी वृत्तसेवा : प्रत्येक ठिकाणी व शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याला लढावे लागणार आहे. काँग्रेसबरोबर आपली आघाडी पूर्वीपासून आहेच. मात्र सध्या शिवसेनाबरोबरही आपली आघाडी आहे. मात्र ही आघाडी भविष्यातही होणार की नाही, हे मला माहिती नाही, असा सूचक वक्तव्य मंत्री छगन भुजबळ यांनी केले. येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात आढावा बैठकीत प्रसंगी मंत्री छगन भुजबळ बोलत होते.
भुजबळ हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असताना सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात राष्ट्रवादी पक्षाची आढावा बैठक घेण्यात आली.
यावेळी शिवसेनेचे माजी आमदार कैलास बापू पाटील व इंदिराताई पाटील यांनी भुजबळ यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
यावेळी राष्ट्रवादीचे आमदार अनिल भाईदास पाटील जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील, माजी आमदार संतोष चौधरी, अरुण भाई गुजराती डॉक्टर सतीश अण्णा पाटील आदी उपस्थित होते
देवडी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना छगन भुजबळ म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस यांची आघाडी यापूर्वी होती. मात्र शिवसेनेबरोबर कधीच आघाडी झाली नव्हती. मात्र यावेळेस सरकार जरूर आहे. भविष्यात शिवसेनेबरोबर आघाडी राहणार की नाही, हे मला माहिती नाही.
आज जळगाव जिल्ह्यात ११ पैकी एक आमदार राष्ट्रवादीचा आहे. त्या मागची कारणे आता जाणून घ्यायची नाही मात्र पूर्वी यात जळगाव जिल्ह्यात सात आमदार हे राष्ट्रवादीचे होते.
येत्या निवडणुकीमध्ये सात पेक्षाही जास्त आमदार राष्ट्रवादीचे निवडून आले पाहिजेत, असा सल्लाही छगन भुजबळ यांनी दिला.
आज यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्यांचे स्वागत सर्वांनी करायची आहे.
जुना-नवीन वाद न आणता आपल्याबरोबर जे आहेत ते नेते म्हणूनच त्यांचे स्वागत करू, या कोठेही दुजाभाव करू नका, नाहीतर त्यांना असेच वाटेल ती उगीच आलो या पक्षात, असा सूचक सल्लाही त्यांनी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना दिला
ओबीसी आरक्षण प्रश्नी न्यायालयाने मागवलेल्या डाटा देण्यास केंद्र सरकार मनाई करीत आहेत. त्यांनी नुकतेच सुप्रीम कोर्टात एक अपडेटेड दिले आहे की, त्यात अनेक त्रुटी आहेत. त्यामुळे आम्ही देऊ शकत नाही. मात्र याच इंपीरियल डाटाचा उपयोग केंद्र सरकार त्यांच्या योजनांसाठी पुरेपूर उपयोग करीत आहे, असा टोलाही छगन भुजबळ यांनी लगावला. त्यांच्या योजनांसाठी हा डाटाबरोबर आहे ओबीसी आरक्षणासाठी हा डाटा का दिला जात नाही, असा सवालही त्यांनी केला.
महाराष्ट्र सदन घोटाळाप्रकरणी बोलताना भुजबळ म्हणाले की, दिल्लीमध्ये उभे असलेले महाराष्ट्र सदन हे राष्ट्रपती भवनानंतर सर्वात उत्कृष्ट असे भवन आहे. हे भवन बांधण्यासाठी कॅबिनेट मंत्रिमंडळाने शंभर कोटीच्या कामाला मंजुरी दिली होती. मात्र माझ्यावर साडे आठशे कोटी रुपये खाल्ल्याचा आरोप लावण्यात आला होता. सात फूट म्हशीला १५ फुटाच रेडकू कसे होईल का, असा टोलाही त्यांनी या वेळी लगावला.
हेही वाचलं का?