स्‍नेहा दुबे यांनी केली पाकिस्‍तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची 'बोलती बंद' | पुढारी

स्‍नेहा दुबे यांनी केली पाकिस्‍तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची 'बोलती बंद'

संयुक्‍त राष्‍ट्र ; पुढारी ऑनलाईन : अपेक्षेप्रमाणचे संयुक्‍त राष्‍ट्र आमसभेत पाकिस्‍तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताविरोधात भूमिका मांडली. यावेळी भारताच्‍या सचिव स्‍नेहा दुबे यांनी अत्‍यंत सडेतोड उत्तर देत इम्रान खान यांची बोलतीच बंद केली. त्‍यांनी भारताची संयुक्‍त राष्‍ट्र आमसभेत भारताची वस्‍तुनिष्‍ठ भूमिका मांडलीच त्‍याचबरोबर पाकिस्‍तानचा दुटप्‍पीपणाही सभागृहासमाेर मांडला. संयुक्‍त राष्‍ट्र आमसभेत पाकिस्‍तानच्‍या पंतप्रधानांना खडेबोल सुनावणार्‍या सेन्‍हा दुबे चर्चेत आल्‍या आहेत. जाणून घेवूया त्‍यांच्‍या विषयी…

संयुक्‍त राष्‍ट्र आमसभेतील पहिल्‍या महिला सचिव

स्‍नेहा यांचे प्रथामिक शिक्षण हे गोव्‍यात झाले. तर पुण्‍यातील फर्ग्युसन कॉलेजमध्‍ये त्‍यांनी महाविद्‍यालयीन शिक्षण घेतले.

यानंतर त्‍यांनी दिल्‍लीमधील ‘जेएनयू’मध्‍ये एम.ए आणि एमफील केलं.

स्‍नेहा दुबे यांना सुरुवातीपासून परराष्‍ट्र धोरणामध्‍ये आवड होती. त्‍यामुळे त्‍यांनी भारतीय परराष्‍ट्र सेवेत जाण्‍याचा निर्णय घेतला.

स्‍नेहा दुबे या २०१२ बॅचच्‍या भारतीय परराष्‍ट्र सेवा (आयएफएस) अधिकारी आहेत.

आयएफएसपदी नियुक्‍ती झाल्‍यानंतर २०१४मध्‍ये त्‍यांची नियुक्‍ती मैड्रिड येथील भारतीय दुतावासात झाली.

यानंतर काही वर्षांनी संयुक्‍त राष्‍ट्र आमसभेत त्‍या भारताच्‍या सचिव म्‍हणून नियुक्‍त झाल्‍या. या पदावर पोहचणार्‍या त्‍या पहिल्‍या भारतीय महिला आहेत.

संयुक्‍त राष्‍ट्र आमसभेत नेमके काय घडलं ?

संयुक्‍त राष्‍ट्र आमसभेत अपेक्षेप्रमाणचे पाकिस्‍तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताविरोधात भूमिका मांडली.

भारतावर निराधार आरोप केल;. यावर स्‍नेहा दुबे यांनी तीव्र आक्षेप घेतला.

त्‍या म्‍हणाल्‍या, पाकिस्‍तानच्‍या पंतप्रधानांनी भारताच्‍या अंतर्गत प्रश्‍न आंतरराष्‍ट्रीय पातळीवर मांडून या व्‍यासपीठाचाच अवमान करण्‍याचा प्रयत्‍न केला आहे. त्‍यांनी केलेले आरोप हा सामूहिक अवमान आहे.

संयुक्‍त राष्‍ट्राच्‍या व्‍यासपीठाचा पाकिस्‍ताने अत्‍यंत चुकीचा वापर केला आहे, असेही त्‍यांनी ठणकावले.

 पंतप्रधान इम्रान खान यांना सडेतोड उत्तर

या वेळी स्‍नेहा दुबे म्‍हणाल्‍या,  केंद्र शासित प्रदेश जम्‍मू -काश्‍मीर आणि लडाख हे भारताचे अविभाज्‍य भाग होते, आहेत आणि यापुढील राहतील. पाकिस्‍तानने यातील काही क्षेत्रावर अवैध कब्‍जा केला आहे. हे क्षेत्र पाकिस्‍तानने तत्‍काळ सोडावे, अशी मागणी आम्‍ही करत आहेत. मात्र दुर्दैवाची बाब म्‍हणजे, मागील काही वर्ष संयुक्‍त राष्‍ट्रच्‍या व्‍यासपीठावरुन पाकिस्‍तानचे नेते भारताविरोधात सातत्‍याने चुकीची माहिती पसरवत आहेत.

भारताची प्रतिमा खराब करण्‍यासाठी संयुक्‍त राष्‍ट्राच्‍या व्‍यासपीठाचा चुकीचा वापर केला जात आहे.

स्‍वत:च्‍या देशातील हिंसाचार आणि दहशतवादाच्‍या समस्‍यांकडे कोणाचेही लक्ष जावू नये म्‍हणून ही व्‍यर्थची धडपड आहे, असेही सुनावत स्‍नेहा दुबे यांनी पाकिस्‍तानच्‍या पंतप्रधान इम्रान खान यांची बोलती बंद केली.

हेही वाचलं का? 

 

Back to top button