

नवी दिल्ली ; पुढारी वृत्तसेवा : आयकर खात्याने (Income Tax raids) चेन्नईतील दोन कंपन्यांवर छापा टाकण्यात आला. या दरम्यान तब्बल तीनशे कोटी रुपयांची बेहिशेबी संपत्ती सापडली आहे. (Income Tax raids in Chennai reveals undisclosed income of more than ₹300 crore)
केंद्रीय प्रत्यक्ष कर नियंत्रण मंडळ (Central Board of Direct Tax Control) अर्थात सीबीडीटीकडून शनिवारी ही माहिती देण्यात आली. तामिळनाडूतील 35 ठिकाणांवर दोन दिवसांपूर्वी आयकर खात्याच्या विविध पथकांनी छापे टाकले होते. (Income Tax raids)
छाप्यांदरम्यान तीनशे कोटी रुपयांची बेहिशेबी संपत्ती सापडली असून हिशेब नसलेले ९ कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत. सदर कंपनीकडून तामिळनाडूतील मोठमोठी कॉर्पोरेट घराणी तसेच कंपन्यांना वाढीव व्याजदरात रोख स्वरुपात अर्थपुरवठा केला जात होता.
अर्थातच याचा हिशोब नसल्याने करचुकवेगिरी होत होती. व्याजाची रक्कम डमी बँक खात्यात जमा केली जात असल्याचेही तपासात दिसून आले आहे, असेही सीबीडीटीकडून सांगण्यात आले आहे.