बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारीपासून | पुढारी

बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारीपासून

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावी परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर केले आहे. बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 21 मार्च 2023 या कालावधीत होणार आहे. दहावीची परीक्षा 2 मार्च ते 25 मार्च 2023 या कालावधीत होणार आहे. अंतिम वेळापत्रक राज्य मंडळाने www. mahahsscboard.in या संकेतस्थळावर अपलोड केले आहे.

मंडळाच्या संकेतस्थळावरील वेळापत्रकांची सुविधा ही फक्त माहितीसाठी आहे. परीक्षेपूर्वी छापील स्वरूपात देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम असेल.

त्या छापील वेळापत्रकावरून परीक्षेच्या तारखांची खात्री करून घ्यावी व विद्यार्थ्यांनी परीक्षा द्यावी. अन्य संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले तसेच व्हॉटस्अ‍ॅप किंवा तत्सम माध्यमातून व्हायरल झालेले वेळापत्रक ग्राह्य धरू नये, असेही मंडळाने म्हटले आहे. यापूर्वी 19 सप्टेंबर रोजी संकेतस्थळावर संभाव्य वेळापत्रक विद्यार्थ्यांना व शाळांना उपलब्ध करून दिली आहेत. या वेळापत्रकाबाबत काही सूचना आल्यानंतर काही पेपरच्या तारखा बदलल्या आहेत, असेही मंडळाने म्हटले आहे.

Back to top button