Shelar Vs Raut : बोलघेवडेपणा करणारे विचारतात, ‘आम्ही कुठे आहोत’ ; शेलारांचा राऊतांवर पलटवार | पुढारी

Shelar Vs Raut : बोलघेवडेपणा करणारे विचारतात, 'आम्ही कुठे आहोत' ; शेलारांचा राऊतांवर पलटवार

पुढारी ऑनलाईन डेस्क : “रोज सकाळी उठून टिव्हीवर बोलघेवडेपणा करणारे विचारतात, ‘आम्ही कुठे आहोत,’ राऊत साहेब आम्ही जनतेच्या सेवेत आहोत!” अशा शब्दात ट्विट करत भाजप नेते आणि मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर पलटवार (Shelar Vs Raut) केला आहे.

शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत हे सकाळी माध्यमांशी बोलताना,“५० खोक्यांसाठी एसआयटी स्थापन करा. उठसूट एसआयटी स्थापन करायची. पोलिसांना काही कामच ठेवायचं नाही. सत्तेचा यंत्रेणाचा गैरवापर सर्रास केला जात आहे. आम्ही सर्व प्रकारच्या चौकशांना सामोरे जाणार आहोत.  बदनामी हे शस्त्र वापरतं आहेत. शिवसेना या अग्निदिव्यातून बाहेर पडेल. अधिक उजळून बाहेर पडू.” असे सांगत “नाईट लाईफला विरोध करणारे आशिष शेलार कुठे आहेत”, असा प्रश्न उपस्थित केला होता.

Shelar Vs Raut : आम्ही जनतेच्या सेवेत 

मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी संजय राऊत यांच्यावर पलटवार करत आपल्या ट्विटमध्ये म्हंटलं आहे की, ” मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारचे जनहिताचे निर्णय, वन रँक वन पेन्शन योजनेत सुधारणा, पूर्वलक्षी प्रभावाने 1 जुलै 2019 पासून लागू करणार, 25 लाखाहून अधिक लाभार्थी, जुलै 2019 ते जून 2022 या कालावधीची थकबाकी 23, हजार 638 कोटी रुपये देणार, 81 कोटी नागरिकांना मोफत धान्य. पुढील ट्विटमध्ये म्हंटल आहे,”गंभीर आजारांवरील 107 औषधांच्या किंमतीवर नियंत्रण, एकीकडे जगभर कोरोनामुळे आर्थिक संकट असताना आपले पंतप्रधान गरिबांची काळजी करीत आहेत. रोज सकाळी उठून टिव्हीवर बोलघेवडेपणा करणारे आम्ही कुठे आहोत विचारतात? मा. राऊत साहेब आम्ही जनतेच्या सेवेत आहोत!

हेही वाचा

Back to top button