मुंबई : कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या मागण्या मान्य करा अन्यथा १२ वी परिक्षेवर बहिष्कार | पुढारी

मुंबई : कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या मागण्या मान्य करा अन्यथा १२ वी परिक्षेवर बहिष्कार

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या मागण्या मान्य करा अन्यथा १२ वी परिक्षेवर बहिष्कार घालू ,असा इशारा महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाचे समन्वयक प्रा.मुकुंद आंधळकर यांनी सोमवारी दिला.

कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या मागण्या मान्य कराव्यात यासाठी नागपूर येथे अधिवेशनात गुरुवारी (दि. २२) आंदोलन करण्यात येणार आहेत. त्यासाठी राज्यातील सर्व शिक्षणाधिकाऱ्यामार्फत शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना प्रत्येक जिल्ह्यात निवेदने सादर केली आहेत.

शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करा, शिक्षकांची रिक्त पदे त्वरित भरा, वीस वर्षांपासून वाढीव पदांवर विनावेतन काम करणाऱ्या शिक्षकांना मान्यता द्या, आय टी विषय अनुदानित करा या व इतर मागण्यांसाठी महासंघाने आंदोलन करण्याचा निर्णय घेतला असल्याचे महासंघाने सांगितले.

हेही वाचा  

Back to top button