मुंबई : सिद्धिविनायक मंदिरातील अनागोंदी कारभाराची चौकशी करा : मनसेचे मुख्यमंत्र्यांना निवेदन | पुढारी

मुंबई : सिद्धिविनायक मंदिरातील अनागोंदी कारभाराची चौकशी करा : मनसेचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : मुंबईतील प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिर महाराष्ट्रातच नव्हे तर देशात पवित्र तीर्थक्षेत्र आहे. अशा पवित्र स्थानी चाललेल्या मनमानी आणि अनागोंदी कारभाराची चौकशी व्हावी, अशी मागणी मनसेने मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

सिद्बिविनायक मंदिरात बाराही महिने भाविकांची गर्दी असते गरीब ते धनाढय सर्वजण सिद्धिविनायकास सोने, चांदी आणि धन अर्पण करतात. मात्र २०१९ ते २०२२ या कालावधीत न्यासाचे अध्यक्ष आणि काही विश्वस्तांनी अनागोंदी कारभार केला, असा आरोप करत संबंधीतांवर कारवाई व्हावी, अशी मागणी मनसेचे उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी केली आहे.

कोरोना काळात प्रसादाकरिता १० हजार लिटर तूप का मागविण्यात आले? नंतर हे तूप इतर मंदिरांना दिले असे सांगितले जाते. माग त्या मंदिरांनी त्याचा वापर कसा केला? त्याची विक्री केली असेल तर त्याचा तपशील आहे का? मंदिर नुतनीकारणासाठी तीन ते चार कोटी रुपयाच्या निविदा मागविण्यात आल्या हे काम १८ महिन्यांत पूर्ण करण्याची अट होती. त्यानंतर 10 हजार दंड लावण्यात येणार होता आजही ते काम पूर्ण नाही, मग दंड का लावला नाही? कोरोना काळात सुरु केलेला क्यू आर कोड, मुख्यमंत्री सहाय्यता निधीत परस्पर देण्यात आलेला 5 कोटींचा निधी, शिवभोजन थाळी, कर्मचारी भरती व पदन्नोती अशा अनेक अनागोंदी कारभाराची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.

हेही वाचा :

Back to top button