Salman Khan's Firing Case : कोर्टाने दोन्ही शस्त्र पुरवठादारांना मुंबई गुन्हे शाखेच्या कोठडीत पाठवले | पुढारी

Salman Khan's Firing Case : कोर्टाने दोन्ही शस्त्र पुरवठादारांना मुंबई गुन्हे शाखेच्या कोठडीत पाठवले

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेता सलमान खानच्या मुंबईतील घरावर गोळीबार केल्याप्रकरणी मुंबईतील एस्प्लेनेड कोर्टाने दोन्ही शस्त्र पुरवठादारांना ३० एप्रिलपर्यंत मुंबई गुन्हे शाखेच्या कोठडीत पाठवले आहे, अशी माहिती एका वृत्तसंस्थेने दिले आहे. (Salman Khan’s Firing Case) १४ एप्रिल रोजी अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर गोळीबाराची घटना घडली होती. (Salman Khan’s Firing Case)

दरम्यान, मुंबई पोलिसांनी पंजाबमधून दोघांना अटक केली आहे. या हल्ला प्रकरणात दोघा जणांना मुंबई पोलिसांनी गुजरातमधून अटक केली. या प्रकरणात कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई आणि त्याचा भाऊ अनमोल बिष्णोई यांना मुंबई पोलिसांनी वाँटेड घोषित केले आहे. अनमोलच्या सांगण्यावरून दोन हल्लेखोरांना पिस्तूल व काडतुसे पुरवणार्‍या सुभाष चंदर आणि अनुज थापन या दोघांना मुंबई पोलिसांनी पंजाबमध्ये अटक केलीय.

Back to top button