महामुंबईत सीएनजी, पीएनजी दरांत पुन्हा भडका | पुढारी

महामुंबईत सीएनजी, पीएनजी दरांत पुन्हा भडका

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

सीएनजी आणि पीएनजी गॅसच्या किमतींमध्ये पुन्हा वाढ झाली आहे. सीएनजीच्या दरात प्रतिकिलो साडेतीन रुपयांची तर घरगुती गॅसच्या किमतीमध्ये दीड रुपयाची वाढ करण्यात आली आहे. शुक्रवार मध्यरात्रीपासून हे नवे दर लागू करण्यात आले आहेत. महानगर गॅस लिमिटेडने मुंबईत ही दरवाढ केली आहे.. त्यामुळे मुंबईकरांना आर्थिक झळ सोसावी लागणार आहे.

ऑगस्ट महिन्यात महानगर गॅस लिमिटेडकडून सीएनजीच्या दरात सहा रुपयांची कपात करण्यात आली होती. त्याचप्रमाणे पीएनजीचे दरही चार रुपयांनी कमी करण्यात आले होते. मात्र, १ ऑक्टोबरपासून नैसर्गिक वायूच्या आयात किमतीत तब्बल ४० टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे महानगर गॅस लिमिटेडने देखील सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ केली आहे. वाढीव दरांनुसार मुंबईत प्रतिकिलो सीएनजीसाठी ८९ रुपये ५० पैसे, तर पीएनजीकरिता ५४ रुपये आकारले जात आहेत. यापूर्वी ५ ऑक्टोबर रोजी सीएनर्जी एनजीच्या दरात वाढ झाली होती..

जुने दर

सीएनजी –   ८६ रुपये

पीएनजी – ५२ रुपये ५० पैसे

नवीन दर

सीएनजी – ८९ रुपये ५० पैसे

पीएनजी – ५४ रुपये

Back to top button