Amol Mitkari Tweet : सध्याच्या घडीला ऑटो चालकांना चांगले दिवस…अमोल मिटकरींचे ट्वीट चर्चेत | पुढारी

Amol Mitkari Tweet : सध्याच्या घडीला ऑटो चालकांना चांगले दिवस...अमोल मिटकरींचे ट्वीट चर्चेत

पुढारी ऑनलाईन डेस्क : सध्याच्या घडीला ऑटो चालकांना चांगले दिवस आले आहेत. त्याचे ज्वलंत उदाहरण एका ऑटो चालकाला 25 खोक्यांची “ओक्के” लॉटरी लागली,  (या घटनेचा राजकारणाशी काहीएक संबंध नाही.) असे ट्विट (Amol Mitkari Tweet) करत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी शिंदे गटावर अप्रत्‍यक्ष निशाणा साधला. 

केरळ राज्‍यातील थिरुअनंतपुरम येथील ऑटाे चालक श्रीवरहम यांनी 25 कोटी रुपयांची लॉटरी जिंकली. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी खोचक ट्विट केले आहे. या ट्विटमधुन त्यांनी शिंदे गटाला टोला लावला आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे की, सध्याच्या घडीला ऑटो चालकांना चांगले दिवस आले आहेत. त्याचे हे ज्वलंत उदाहरण एका ऑटो चालकाला 25 खोक्यांची “ओक्के” लॉटरी लागली.  (या घटनेचा राजकारणाशी काहीएक संबंध नाही.) मिटकरींच्या या  ट्विटची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे.

कोण आहेत श्रीवरहम?

केरळच्या तिरुअनंतपुरम येथील एका 30 वर्षीय ऑटो रिक्षा चालकाने 1 नव्हे दोन नव्हे तर तब्बल 25 कोटी रुपयांची लॉटरी जिंकली आहे. या व्यक्तीने ओणम बंपर लॉटरी जॅकपॉट जिंकला आहे. श्रीवरहम मूळचे अनूप बी असे या व्यक्तीचे नाव आहे. कराची रक्कम जाऊन या लॉटरीतील 15.75 कोटी रुपये मिळतील, ज्यामुळे त्याला स्ट्रॅटोस्फेरिक संपत्ती मिळेल.

श्रीवरहम तसे तर एक उत्तम शेफ आहे. रस्त्याच्या कडेला एका भोजनालयात तो स्वयंपाकी होते. मात्र, याठिकाणी पगार खूप कमी हाेता.  कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा गाडा चांगल्या पद्धतीने चालावा यासाठी त्याने ऑटो रिक्षा चालवायला सुरुवात केली. त्यांनी मलेशियातील एका हॉटेमध्ये शेफ म्हणून रुजू होण्यासाठी  मलेशियाच्या व्हिसासाठी अप्लाय केला होता. पुढच्या आठवड्यात त्यांना हा व्हिसा मिळण्याची अपेक्षा होती.

हेही वाचलंत का?

Back to top button