पुढारी ऑनलाइन डेस्क : कोणाचे भाग्य कधी बदलेल हे खरंच सांगता येत नाही. भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेच आहे कर्म करत चला फळाची आशा ठेवू नका. तसेच वेळेपूर्वी किंवा वेळेपेक्षा जास्त कुणाला काहीच मिळत नाही. त्यामुळे निष्काम कर्म करत चलावे. याचाच अनुभव एका ऑटो रिक्षा चालकाला आला आहे. केरळच्या तिरुअनंतपुरम येथील एका 30 वर्षीय ऑटो रिक्षा चालकाने 1 नव्हे दोन नव्हे तर तब्बल 25 कोटी रुपयांची लॉटरी जिंकली आहे. या व्यक्तिने ओणम बंपर लॉटरी जॅकपॉट जिंकला आहे. श्रीवरहम मूळचे अनूप बी असे या व्यक्तिचे नाव आहे. कराची रक्कम जाऊन या लॉटरीतील 15.75 कोटी रुपये मिळतील, ज्यामुळे त्याला स्ट्रॅटोस्फेरिक संपत्ती मिळेल.
श्रीवरहम तसे तर एक उत्तम शेफ आहे. रस्त्याच्या कडेला एका भोजनालयात तो स्वयंपाकी होता. मात्र, याठिकाणी पगार खूप कमी भेटत असल्याने कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा गाडा चांगल्या पद्धतीने चालावा यासाठी त्याने ऑटो रिक्षा चालवायला सुरुवात केली. तसेच त्याने मलेशियातील एका हॉटेमध्ये शेफ म्हणून रुजू होण्यासाठी त्याने मलेशियाच्या व्हिसासाठी अप्लाय केला होता. पुढच्या आठवड्यात त्याला हा व्हिसा मिळण्याची अपेक्षा होती.
ओणम निमित्त इथे ओणम बंपर लॉटरी दरवर्षी काढली जाते. श्रीवरहम यांना नेहमीच लॉटरीचे तिकीट घेण्याची सवय होती. त्याने सांगितले, "मी 22 वर्षांचा असल्यापासून लॉटरी खरेदी करत आहे आणि मी अनेक वेळा बक्षिसे जिंकली आहेत. मी जिंकलेले कमाल बक्षीस फक्त 2,000 रुपये होते."
यावेळीही त्याला तिकिट घ्यायचे होते तिकिटाची किंमत 500 रुपये होती पण ते ही त्याला कमी पडत होते. म्हणून त्याने आपला मुलगा अद्वैथची पिगी बँक फोडून त्याने तिकीट खरेदी करण्यासाठी पैसे जमवले. शनिवारी संध्याकाळी त्याने राज्यातील आतापर्यंतच्या सर्वाधिक बक्षीस रकमेचे तिकिट TJ750605 खरेदी केले होते.
अनूपने त्याची चुलत बहीण सुजया ही लॉटरी एजंट असली तरी अटिंगल या भगवती लॉटरी एजन्सीकडून तिकीट खरेदी केले होते. तो म्हणाला, "मला वाटले की मी यावेळी ते थेट एजन्सीकडून खरेदी करेन, परंतु मी घेतलेले हे पहिले तिकीट नव्हते. मी निवडलेल्या पहिल्या तिकिटाच्या मालिका क्रमांकावर मी खूश नव्हतो. 750605 हा क्रमांक फॅन्सी नंबरसारखा वाटला," असे त्याने सांगितले. त्याची पत्नी माया हिनेच रविवारी दुपारी अनूपला जॅकपॉट जिंकल्याची माहिती दिली.
यावेळी अनुपने सांगितले, "मी एका सहकारी बँकेकडून 3 लाख रुपयांच्या कर्जासाठी अर्ज केला होता. ते मंजूर झाल्याची माहिती त्यांनी काल मला दिली. मी त्यांना आता कळवले आहे की मला ते कर्ज नको आहे," तो म्हणाला.
कोचीच्या जयपालन पीआर या ऑटोरिक्षा चालकाने देखिल गेल्या वर्षी जिंकला होता. ओणम बंपरची लॉटरी जिंकली होती.
हे ही वाचा :