Mega block : मुंबईत रविवारी रेल्वेचा मुख्यमार्गावर मेगा ब्लॉक | पुढारी

Mega block : मुंबईत रविवारी रेल्वेचा मुख्यमार्गावर मेगा ब्लॉक

मुंबई; पुढारी ऑनलाईन : रविवारी (दि.१२) मध्य, पश्चिम आणि हार्बर अशा तिन्ही रेल्वे मार्गांवर मेगा ब्लॉक (Mega block) घेण्यात येणार आहे. मेगा ब्लॉकमुळे प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. मध्य रेल्वेच्या मुंबईने विभागाने रविवारी (दि. १२) विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामानिमित्त उपनगरीय विभागांवर मेगा ब्लॉक ठेवला आहे. या दरम्यान सीएसटी (छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) पासून सुटणाऱ्या गाड्या या धिम्या गतीने धावणार आहेत.

हार्बर रेल्वे मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी दरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे. तर मध्य रेल्वेवर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार दरम्यान मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. रेल्वेचे तांत्रिक कामे तसेच रुळाच्या देखभालीसाठी हा ब्लॉक घेण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. मध्य रेल्वेप्रमाणेच पश्चिम रेल्वेवर देखील उद्या ब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेवर माहीम ते वांद्रे स्थानकांदरम्यान सहा तासांचा ब्लॉक घेतला जणार आहे.

मध्य रेल्वेवर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार या मार्गावर अप आणि डाऊन धिम्या मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी 10 वाजून 55 मिनिटांपासून ते दुपारी 3 वाजून 55 मिनिटांपर्यंत हा ब्लॉक असणार आहे. या मार्गावर उद्या पाच तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या काळात या मार्गावर धावणाऱ्या काही धिम्या लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. तर काही लोकल या धिम्या मार्गावरून जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. विद्याविहारवरून पुढील मार्गावर मात्र धीम्या मार्गावरील लोकलच्या फेऱ्या सुरळीत सुरू राहणार आहेत.

सीएसटी येथून सकाळी १०.४८ ते दुपारी ३.४९ या वेळेत सुटणाऱ्या धीम्या मार्गावरील सेवा सीएसटी ते विद्याविहार स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील व भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकांवर थांबून पुढे पुन्हा योग्य डाउन धिम्या मार्गावर वळवण्यात येतील. घाटकोपर येथून सकाळी १०.४१ ते दुपारी ३.५२ वाजेपर्यंत अप धीम्या मार्गावरील सेवा विद्याविहार ते सीएसटी दरम्यान कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येईल

हार्बर रेल्वेवर सीएसएमटी ते चुनाभट्टी दरम्यान ब्लॉक घेतला जाणार आहे. अप आणि डाऊन अशा दोन्ही मार्गावर हा ब्लॉक घेतला जाणार आहे. सकाळी 11 वाजून 10 मिनिटांनी ब्लॉकला सुरुवात होणार असून, दुपारी 4 वाजून 40 मिनिटांपर्यंत हा ब्लॉक घेतला जाणार आहे. या ब्लॉक दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून वडाळा रोड, वाशी, बेलापूर, पनवेलकरता सुटणाऱ्या अप आणि डाऊन फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. या काळात पनवेल-कुर्ला दरम्यान विषेश फेऱ्या चालवण्यात येणार आहेत.

ब्लॉक कालावधीत पनवेल-कुर्ला (प्लॅटफॉर्म क्र. ८) या सेक्शनमध्ये विशेष उपनगरीय ट्रेन चालविण्यात येईल. हे मेंटेनन्स मेगा ब्लॉक्स पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहेत. यामुळे प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाने दिलगीरी व्यक्त केली आहे.

Back to top button