Ranji Trophy Controversy : बापरे! उत्तराखंड क्रिकेट संघाने ३५ लाखांची केळी केली फस्‍त, खाण्‍यावरील खर्च १.७४ कोटी! | पुढारी

Ranji Trophy Controversy : बापरे! उत्तराखंड क्रिकेट संघाने ३५ लाखांची केळी केली फस्‍त, खाण्‍यावरील खर्च १.७४ कोटी!

पुढारी ऑनलाईन डेस्‍क :
क्रिकेट आणि वादविवाद याचे नाते पहिल्‍यापासून कायम आहे. त्‍यामुळेच खेळापेक्षाही अन्‍य गोष्‍टींमुळे होणारे वाद नेहमीच चर्चेत असतात. यंदाची रणजी करंडक २०२१-२२ स्‍पर्धा ही ( Ranji Trophy Controversy ) वादापासून लांब राहिलेली नाही. या स्‍पर्धेतील मुंबईने उत्तराखंड संघाचा तब्‍बल ७२५ धावांनी पराभव करत प्रथमश्रेणी क्रिकेटमध्‍ये ( फर्स्ट क्‍लास क्रिकेट ) तब्‍बल ९२ वर्षांपूर्वीचा विक्रमही मोडित काढला होता. रणजी करंडक स्‍पर्धेत सुमार कामगिरी करणारा उत्तराखंडचा संघ आता नव्‍या वादात सापडला आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, उत्तराखंड क्रिकेट संघ कागदावर कोट्यवधी रुपयांचा खर्च दाखवते. तर खेळाडूंना दररोज भत्ता म्‍हणून केवळ १०० रुपये देते. मात्र हा दावा उत्तराखंड क्रिकेट असोसिएशनने फेटाळला आहे. मात्र यानंतर उत्तराखंड क्रिकेट असोसिएशनने खेळाडूंच्‍या खाण्यावर दाखवलेला खर्च सर्वांनाच धक्‍का देणारा ठरला आहे.

Ranji Trophy Controversy : ३५ लाखांची केळी, पाण्‍यावर खर्च केले २२ लाख!

उत्तराखंड क्रिकेट असोसिएशनने खेळाडूंच्‍या खाण्‍यावर तब्‍बल १.७४ कोटी रुपये खर्च केला आहे. दरररोजच्‍या भत्‍यासाठी ४९ लाख ५८ हजार रुपये खर्च केले आहेत. सर्वांनाच अचंबित करणारी बाब म्‍हणजे, केळे आणि पिण्‍याचे पाणीयावरील खर्च. तब्‍बल ३५ लाख रुपयांचा चुराडा हा केळे खरेदीवर केला असून, २२ लाख रुपये पिण्‍याचे पाणी खरेदीसाठी केल्‍याचा दावा उत्तराखंड क्रिकेट असोसिएशनने केला आहे.

उत्तराखंड क्रिकेट फक्‍त मोठ्या प्रमाणात करण्‍यात आलेल्‍या खर्चामळे वादाच्‍या भोवर्‍यात सापडलेले नाही. तर प्रशासकीय अनियमितताही समोर आल्‍या आहेत. २०२१-२२ या वर्षात खेळडूंसाठी १२५० तर सपोर्ट स्‍टाफला १५०० रुपये दैनिक भत्ता
म्‍हून देण्‍यात आल्‍याचा दावा केला जात आहे. बायो-बबल म्‍हणून खेळाडू बाहेर खाण्‍यासाठी जावू शकत नव्‍हते. त्‍यामुळे त्‍यांना हॉटेलमधून जेवण मागविण्‍यात आले, असे उत्तराखंड क्रिकेट असोसिएशनने म्‍हटलं आहे.

हेही वाचा : 

 

Back to top button