छत्रपती संभाजीनगर : ‘…तोपर्यंत राजकीय नेत्‍यांना पिंपळदरी गावात प्रवेश बंदी’ | पुढारी

छत्रपती संभाजीनगर : '...तोपर्यंत राजकीय नेत्‍यांना पिंपळदरी गावात प्रवेश बंदी'

पिंपळदरी; पुढारी वृत्तसेवा मराठा आरक्षणाचा लढा राज्यात चांगलाच तापला आहे. राज्यभरात मराठा बांधवांकडून आंदोलन, मोर्चे सुरू आहेत. आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारची कोंडी केली आहे. असे असतानाच आता गावकऱ्यांनी राजकीय नेत्यांनाही गावात प्रवेश बंदी केली आहे.

सिल्लोड तालुक्यातील पिंपळदरी गावातील नागरिकांनी आता मोठा निर्णय जाहीर केला आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी जगप्रसिद्ध अजिंठा लेणीच्या रोडवरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर राजकीय नेत्‍यांना गाव बंदीचा बोर्ड लावण्यात आला आहे. याकडे सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. गावातील तरुणांनी अक्षरश मराठा आरक्षण मिळेपर्यंत पुढार्‍यांना गाव बंदीचा निर्णय घेतला आहे.

मराठा समाजास जोपर्यंत आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत पिंपळदरी गावात विविध राजकीय पक्षांच्या पुढाऱ्यांना गावात येण्यास बंदी घालण्याचा निर्णय पिंपळदरी येथील सकल मराठा समाजाने घेतला आहे.

गावात घेण्यात आला निर्णय

दसरा मेळाव्यासाठी गावातून एक ही व्यक्त जाणार नाही. गावात दसरा मेळाव्यासाठी गावात कोणत्याही नेत्याची गाडी आली, तर त्या गाडी पुन्हा पाठवण्यात येणार असल्‍याच गावकऱ्यांनी जाहीर केलं आहे. पिंपळदरी गावात कोणत्याही नेत्याने आपला अपमान होणार नाही याची जाणीव ठेवून गावात प्रवेश करावा अशी भूमीका गावकऱ्यांनी घेतली आहे.

हेही वाचा :

Back to top button