छत्रपती संभाजीनगर : वकिलांचा कामकाजावर बहिष्काराचा निर्णय | पुढारी

छत्रपती संभाजीनगर : वकिलांचा कामकाजावर बहिष्काराचा निर्णय

छत्रपती संभाजीनगर : ३ ऑक्टोबर २०२३ पर्यंत फौजदारी न्यायालये पुन्हा खंडपीठाच्या जुन्या इमारतीमध्ये सुरू न झाल्यास ४ ऑक्टोबर पासून उच्च न्यायालयातील दिवाणी व फौजदारी कामकाजात वकिलांनी सहभागी न होण्याचा सर्वानुमते निर्णय घेतला आहे.

जुन्या इमारतीमध्ये दिवाणी व फौजदारी न्यायालयांचे कामकाज चालू ठेवावे. नव्या इमारतीमध्ये न्यायालयाच्या रजिस्ट्रीचे कामकाज व सर्व कार्यालये स्थलांतरित करून दोन्ही इमारतींत कामकाज चालू ठेवावे, असे वकील संघाच्या १२ सप्टेंबरच्या विशेष सर्वसाधारण सभेत सर्वानुमते ठरले होते. त्यानंतर २१ सप्टेंबरला उच्च न्यायालयाच्या संकेतस्थळावर फौजदारी न्यायालये नवीन इमारतीमध्ये नेण्याची नोटीस टाकण्यात आली. उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींना सदर ठराव कळविण्यात आला होता. त्याची प्रशासनाने दखल घेतली नसल्यामुळे २६ सप्टेंबर रोजी वरीलप्रमाणे निर्णय घेण्यात आल्याचे ठरावात म्हटले आहे.

Back to top button